Bobby Deol intimate scene in Aashram series : अभिनेता बॉबी देओलने मागील दोन वर्षांमध्ये बॉलीवूडमध्ये दमदार पुनरागमन केले आहे. ९० च्या दशकात रोमँटिक हिरो म्हणून लोकप्रियता मिळवल्यानंतर बॉबीने आता खलनायकाच्या भूमिकांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘आश्रम’, ‘ॲनिमल’ आणि ‘क्लास ऑफ ८३’मधील त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्या. विशेष म्हणजे ‘आश्रम’ सीरिजमधील इंटिमेट सीनबाबत बॉबी देओलने नुकताच मोठा खुलासा केला आहे. इंटिमेट सीन शूट होण्यापूर्वी त्याने पत्नीशी चर्चा केल्याचे एका मुलाखतीत सांगितल्याने चर्चांना उधाण आले आहे.

आश्रम सीरिजबद्दल राखली गुप्तता

शेखर सुमन यांच्या ‘शेखर टुनाईट’ या शोमध्ये बॉबी देओलने उपस्थिती लावली होती. यावेळी बॉलीवूडमधील लोकप्रियता, अपयश आणि कमबॅक यावर स्पष्टपणे भाष्य केले आहे. यावेळी संघर्षाच्या काळात बायको तान्या देओलने दिलेली साथ आणि या काळात आलेले अनुभव बॉबीने सांगितले आहेत. प्रकाश झा यांच्या आश्रम सीरिजची ऑफर स्वीकारल्याचेदेखील बॉबीने कोणाला सांगितले नव्हते. बॉबी म्हणाला की, पहिल्यांदा मी आश्रमची कथा वाचल्यानंतर कोणालाही सांगितले नाही. तेव्हा मी माझ्या वडिलांना, आईला किंवा अगदी माझ्या भावालाही सांगितले नव्हते. मी फक्त एकाच व्यक्तीला याबद्दल सांगितले होते, ती म्हणजे माझी पत्नी, असे बॉबी देओलने सांगितले.

इंटिमेट सीनबद्दल बायकोला सांगितले

‘आश्रम’मध्ये या लोकप्रिय सीरिजच्या इंटिमेट सीनबाबत अनेक चर्चा झाल्या आहेत. यामध्ये काम करण्यापूर्वी बॉबी देओलने पत्नीला याबाबत कल्पना दिली होती. बॉबी म्हणाला की, या इंटिमेट सीनबाबत मला तिला (पत्नीला) सांगावेच लागणार होते, कारण जर तिला याबाबत नंतर समजले असते तर मी अडचणीत आलो असतो, त्यामुळे मीच तिला आधी याबद्दल सांगितले, असे बॉबी देओलने सांगितले आहे.

माझी पत्नी माझा आधारस्तंभ – बॉबी

संघर्षाच्या काळामध्ये बायकोने साथ दिल्याचे बॉबीने सांगितले. तो म्हणाला की, आज मी जे काही आहे ते माझ्या पत्नीमुळेच आहे. माझे चित्रपट जेव्हा येत नव्हते तेव्हा तिने संपूर्ण घराची जबाबदारी एकटीने सांभाळली. माझ्यातील कलेचे आणि अभिनेत्याचे तान्याने नेहमीच कौतुक केले. माझी पत्नी माझा आधारस्तंभ बनली. तिने मला समजून घेत नेहमीच प्रोत्साहन दिले, असे बॉबी देओलने सांगितले आहे.

‘आश्रम’ सीरिजचा करिअरला मोठा फायदा

एका मुलाखतीमध्ये बॉबी देओलने ‘आश्रम’ची ऑफर का स्वीकारली हे सांगितले होते. तो म्हणाला की, मला आता हिरोची ऑफर येणार नाही याची मला जाणीव झाली होती, त्यामुळे ‘आश्रम’मध्ये काम करत असल्याचे मी कोणाला सांगितले नाही. सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर मला लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो आणि त्यांना माझी भूमिका कशी वाटते हे बघायचे होते. बॉबी देओलने पुढे सांगितले की, मला नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करायला आवडतात. ‘आश्रम’ सीरिजमुळे करिअरला मोठा फायदा झाला. प्रेक्षकांनी या भूमिकेचे खूप कौतुक केले असे बॉबी देओलने सांगितले आहे.