दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक सिद्दीकी इस्माईल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते ६३ वर्षांचे होते. सिद्दीकी इस्माईल यांनी सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. सिद्दीकी इस्माईल यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

सिद्दीकी इस्माईल यांना गेल्या महिन्यात यकृताच्या आजारामुळे कोची येथील अमृता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी (७ ऑगस्ट) दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना एक्स्ट्राकॉर्पोरल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन (ECMO) सपोर्टवर ठेवण्यात आले होते. पण डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतरही त्यांचे निधन झाले.
आणखी वाचा : “जोधपुरी सूट, ब्रोच अन्…” ‘केबीसी’च्या आगामी पर्वात अमिताभ बच्चन यांच्या लूकमध्ये होणार बदल, स्टायलिस्ट म्हणाली…

सिद्दीकी इस्माइल हे लोकप्रिय मल्याळम चित्रपट दिग्दर्शक होते. मल्याळम व्यतिरिक्त, सिद्दीकी यांनी तामिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांचे देखील दिग्दर्शन केले होते. २०२० मध्ये प्रदर्शित झालेला ‘बिग ब्रदर’ हा त्याचा शेवटचा चित्रपट होता. यात अरबाज खान, अनूप मेनन, विष्णू उन्नीकृष्णन, सर्जनो खालिद, हनी रोज, मिर्ना मेनन, चेतन हंसराज, गाधा, सिद्दीकी आणि टिनी टॉम यांच्याबरोबर मोहनलाल मुख्य भूमिकेत झळकले होते.

विशेष म्हणजे सिद्दीकी यांनी २०११ मध्ये सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. यात करीना कपूर, कतरिना कैफ, हेजल केच, राज बब्बर यांच्यासारखे कलाकार झळकले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिद्दीकी यांनी फिल्ममेकर फाझिलच्या मदतीने सिनसृष्टीत प्रवेश केला. फाझिल यांनी त्यांना आणि त्यांचा मित्र लाल यांना कोचीन कलाभवनच्या मिमिक्री ट्रूपसोबत एका परफॉर्मन्स करत असताना पाहिले. त्यानंतर सिद्दीकी-लाल या जोडीने दिग्दर्शनात आपली कारकीर्द सुरू केली. त्यांनी रामजी राव स्पीकिंग (१९८९) या कॉमेडी चित्रपटाद्वारे पदार्पण केले. यामध्ये स्वतः फाजील यांनी पैसे गुंतवले होते. यानंतर त्यांनी मल्याळम चित्रपटाच्या इतिहासातील मालिका सुरू केली. ‘हरिहर नगर’ (१९९०), ‘गॉडफादर’ (१९९१), ‘व्हिएतनाम कॉलनी’ (१९९२), ‘काबुलीवाला’ (१९९३), ‘हिटलर’ (१९९६) सारखे हिट चित्रपट केले.