पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांचे लाखो-करोडो चाहते असतात. हे कलाकार जर प्रत्यक्षात समोर आले तर त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी होत असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळते. अनेकदा कलाकार स्वत: थांबून चाहत्यांबरोबर फोटो काढतात. मात्र, अनेकदा कलाकार नकारही देतात. आता बॉलीवू़डचा किंग खान शाहरूख खान(Shahrukh Khan)बद्दल बॉडीगार्ड युसूफ इब्राहिमने असाच एक किस्सा सांगितला आहे. एका चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा अभिनेत्याने त्या चाहत्याला फटकारले होते, असा खुलासा बॉडीगार्डने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण त्यांचे खरे आयुष्य खडतर…

सेलिब्रिटी बॉडीगार्ड युसूफ इब्राहिमने नुकतीच सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीत युसूफ इब्राहिमने म्हटले, “मीडिया बऱ्याचदा कलाकारांबाबत अशा क्षणाच्या शोधात असते, जे तो व्हायरल करू शकतात. पण, तीसुद्धा माणसं आहेत. जेव्हा अचानक कोणीतरी त्यांना फोटोसाठी विचारते, विशेषत: ते वेगळ्या मनस्थितीत असतात, चाहत्यांचे असे वागणे अपेक्षित नसते. चाहत्यांनी त्यांची सीमा ओलांडली नाही पाहिजे. कलाकारांप्रति आदर दाखवला पाहिजे. फोनबरोबर गर्दी कऱण्याऐवजी त्यांनी शांतपणे फोटो काढता येईल का हे विचारले पाहिजे. कलाकारसुद्धा माणसंच असतात, हे चाहत्यांनी समजून घेतलं पाहिजे. एखादा व्हिडीओ बघणं व जज करणं सोपं आहे, पण त्यांचे खरे आयुष्य खडतर आहे. जेव्हा चाहते कलाकारांचे आयुष्य पाहतील तेव्हा त्यांना समजेल की त्यांचे आयुष्य तुलनेने सोपे आहे. पडद्यामागे ते खूप मेहनत करत असतात. मेकअप रूममध्ये ते तासनतास बसलेले असतात. सलग १२ तास प्रखर प्रकाशात राहतात. या सगळ्या मेहनतीमध्ये त्यांना त्यांचा खासगी वेळ खूप कमी मिळतो. इतक्या थकव्यानंतर जर अचानक त्यांच्या त्या स्पेसमध्ये कोणी आले तर त्यांची चिडचिड होणे सहाजिक आहे. त्यांच्या त्या प्रतिक्रिया समजून घेता येण्यासारख्या असतात.”

युसूफ इब्राहिमने आतापर्यंत ए-लिस्टमधील अनेक कलाकारांना सिक्युरिटी दिली आहे. यामध्ये आलिया भट्ट, वरूण धवन, अनन्या पांड्ये या कलाकारांचादेखील समावेश आहे.

हेही वाचा: “लग्न फार उशीरा…”, लोकप्रिय मराठी अभिनेत्री सुरेखा कुडची म्हणाल्या, “फार अपेक्षा…”

दरम्यान, शाहरूख खान नुकताच मुफासा द लायन किंगमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये मुफासाला शाहरूख खानने आवाज दिला आहे. आता तो लवकरच किंग या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता त्याच्या अभिनयाबरोबरच तो ज्या पद्धतीने इतरांना वागणूक देतो, त्यासाठीदेखील प्रसिद्ध आहे. त्याच्या प्रेमळ वागणुकीचे अनेक किस्से त्याच्याबरोबर काम केलेले कलाकार वेळोवेळी सांगताना दिसतात.