bolllywod actress kajol will be again working with karan johars new film and also playing mother role of ibrahim khan spg 93 | करण जोहरच्या आगामी चित्रपटात झळकणार काजोल? 'या' स्टारकीडच्या आईची भूमिका साकारणार | Loksatta

करण जोहरच्या आगामी चित्रपटात झळकणार काजोल? ‘या’ स्टारकीडच्या आईची भूमिका साकारणार

दिग्दर्शन बोमन इराणी यांचा मुलगा कयोज इराणी करत आहे.

करण जोहरच्या आगामी चित्रपटात झळकणार काजोल? ‘या’ स्टारकीडच्या आईची भूमिका साकारणार
फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

बॉलिवूडमधील बिनधास्त अभिनेत्री आणि आपल्या अभिनयनाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे काजोल. नुकताच तिचा ‘सलाम वेंकी’ नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरून तिचं सगळीकडे कौतुक होत आहे. काजोलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे काजोल पुन्हा एकदा करण जोहरच्या चित्रपटात दिसणार अशी चर्चा आहे.

‘कुछ कुछ होता हैं’, ‘कभी ख़ुशी कभी गम’, ‘माय नेम इज खान’ या करण जोहरच्या चित्रपटांमध्ये काजोलने काम केले आहे. काजोलने या तुम्ही चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. ती एक सक्षम अभिनेत्री आहेच. करण जोहर आणि ती असं समीकरण आहेच आता पुन्हा एकदा ती त्याच्या चित्रपटात अनेक वर्षांनंतर दिसणार आहे. महत्वाचं म्हणजे या चित्रपटात ती सैफ अली खानच्या मुलाची म्हणजे इब्राहिम खानच्या आईच्या भूमिकेत दिसणार अशी चर्चा आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनद्वारे या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे, तर त्याचे दिग्दर्शन बोमन इराणी यांचा मुलगा कयोज इराणी करत आहे.

यामी गौतमचा ‘लॉस्ट’ हा थरारपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

कथेबद्दल बोलताना, रिपोर्ट्स असा दावा करत आहेत की त्याची पटकथा देशाच्या संरक्षण दलाभोवती विणली गेली आहे. तथापि, हे केवळ दावे आहेत आणि अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही. या चित्रपटातून इब्राहिम खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुढील वर्षी सुरुवात होण्याची शक्यता आहे.

दरम्यान काजोलचा ‘सलाम वेंकी’ चित्रपट येत्या ९ डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर दाखल होईल. या चित्रपटात राजीव खंडेलवालबरोबर आहाना कुमरा, प्रकाश राज या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. तर आमिर खान या चित्रपटामध्ये पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 20:48 IST
Next Story
“आता मंदाकिनी हो..” ट्विंकल खन्नानं सांगितली दिग्दर्शकाच्या फर्माईशीची आठवण