scorecardresearch

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आशिष विद्यार्थी ६०व्या वर्षी दुसऱ्यांदा अडकले विवाहबंधनात, फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी ६०व्या वर्षी दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ

ashish-vidyarth-tied-knot
आशिष विद्यार्थी ६०व्या वर्षी दुसऱ्यांदा अडकले विवाहबंधनात. (फोटो : इन्स्टाग्राम)

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते आशिष विद्यार्थी दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकले आहेत. बॉलिवूडचे व्हिलन अशी ओळख असलेले आशिष विद्यार्थी यांनी ६०व्या वर्षी पुन्हा विवाह केला आहे. आशिष विद्यार्थी यांनी रुपाली बरुआ यांच्याशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

आशिष व रुपाली यांनी गुरुवारी(२५ मे) कोलकाता येथे कुटुंबीय व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत कोर्ट मॅरेज पद्धतीने विवाह केला. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्नानंतर जवळील नातेवाईक व मित्रपरिवारासाठी रिसेप्शन सोहळा ठेवण्यात येणार असल्याची माहिती आशिष विद्यार्थी यांनी दिली आहे.

हेही वाचा>> ट्रकने कारला धडक दिली अन्…; वैभवी उपाध्यायच्या कारचा अपघात नेमका कसा झाला? सीटबेल्ट न लावल्यामुळे अभिनेत्रीचा मृत्यू?

‘इटाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार लग्नानंतर आशिष विद्यार्थी यांनी त्यांच्या भावनाही व्यक्त केल्या. “या वयात रुपालीशी लग्न करणं, हे फिलिंग खूप छान आहे. आम्ही सकाळी कोर्ट मॅरेज पद्धतीने लग्न केलं. संध्याकाळी लग्नाचं रिसेप्शन ठेवण्यात आलं आहे,” असं ते म्हणाले. आशिष विद्यार्थी यांची पत्नी रुपाली बरुआ या आसामच्या आहेत. फॅशन इंडस्ट्रीमध्ये त्या कार्यरत आहे. कोलकाता येथे त्यांच्या मालकीचं फॅशन स्टोर आहे.

हेही वाचा>> सुप्रसिद्ध मराठी संगितकाराच्या लेकाला बारावीत मिळाले तब्बल ८९.३३ टक्के, पोस्ट शेअर करत म्हणाले, “१०० पैकी…”

आशिष विद्यार्थी यांनी तमिल, मल्याळम, कन्नड अशी ११ हून अधिक भाषांमध्ये काम केलं आहे. जवळपास २०० चित्रपटांत ते झळकले आहेत. ‘बिच्छू’, ‘अर्जुन पंडित’, ‘जिद्दी’, ‘बादल’ यांसारख्या चित्रपटात त्यांनी साकारलेला व्हिलन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-05-2023 at 17:22 IST

संबंधित बातम्या