अभिनेता अभय देओल हा हटके भूमिका साकारणारा आणि साचेबद्ध अभिनयाऐवजी वेगवेगळे प्रयोग करणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो. ‘जिंदगी मिलेगी न दोबारा’, ‘देव डी’सारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याच्या भूमिकांचं कौतुक झाल्याचं आपल्याला पहायला मिळालं आहे. नुकतीच त्याच्या ‘ट्रायल बाय द फायर’ या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. नुकतीच त्याने एका मुलाखतीत त्याने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर भाष्य केलं आहे.
अभय देओलने अमर उजाला दिलेल्या मुलाखतीत त्याने वेबसीरिजवर, भूमिकेबद्दल आणि अनुराग कश्यप यांच्याबद्दल भाष्य केलं आहे. अभयला विचारण्यात आले की नुराग कश्यपबरोबर काम करण्याची उत्सुकता अजूनही तशीच आहे का? त्यावर अभयने उत्तर दिले, “मी त्याच्याबरोबर कधीही काम करणार नाही, त्याने माझ्याबद्दल खोट्या अफवा पसरवल्या आहेत. माझ्याबद्दल खूप वाईट गोष्टी तो बोलला आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीसमोर तुम्ही मनमोकळेपणाने बोलता तेव्हा लोक तुमचा गैरफायदा घेण्यास सुरुवात करतात. मी अनुराग कश्यपबरोबर ‘देव डी’मध्ये काम केले. त्यांच्यासोबत काम करण्याचा माझा अनुभव चांगला नाही. भविष्यात मला त्याच्याबरोबर काम करण्याची इच्छा नाही.” अशा शब्दात त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अभयने ‘सोचा ना था’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय चित्रपट ‘चॉप स्टीक’ यात प्रमुख भूमिका साकारताना दिसला होता. आता तो ट्रायल बाय द फायरमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याने साकारलेली भूमिका शेखर कृष्णमूर्ती यांच्यावर बेतलेली आहे. शेखर कृष्णमूर्ती आणि त्यांच्या पत्नीने तब्बल २४ वर्ष न्यायासाठी लढा दिलायादरम्यान दोघांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले. न्यायासाठी किती अडचणी आल्या. हे या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे.