अभिनेता अभिषेक बच्चनने आपल्या अभिनयानं बॉलीवूडमध्ये एक वेगळं निर्माण केलं आहे. २००० साली त्यानं अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. ‘रिफ्यूज’ हा त्याचा पहिला चित्रपट. त्यानंतर अभिषेकनं बऱ्याच चित्रपटातून व वेब सीरिजमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिषेक नेहमी प्रत्येक मुद्द्यांवरआपली मत बिनधास्त मांडत असतो. यामुळे त्याला कधी ट्रोलर्सचा सामना करावा लागतो. पण त्या ट्रोलर्सला तो सडेतोड उत्तर देतो. अलीकडेच अभिषेकनं एका प्रश्नाचं असं उत्तर दिलं आहे, जे सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. शिवाय त्यानं नवोदित अभिनेत्यांना एक सल्लाही दिला आहे. हेही वाचा - Video: करण कुंद्रानं तेजस्वीला आंटी म्हणून मारली हाक; संतप्त नेटकरी म्हणाले, “३९ वर्षांचा…” नुकतीच अभिषेक बच्चन यानं 'दैनिक भास्कर' या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी त्याला विचारलं गेलं की, 'तू चित्रपटासाठी सिक्स पॅक अॅब्स बनवशील का? या प्रश्नावर अभिषेक बच्चन म्हणाला की, "जय दीक्षित एक पोलीस होता, जो फिट होता. पण तो असा नव्हता की, तो प्रेक्षकांना शर्ट काढून प्रेक्षकांना सिक्स पॅक अॅब्स दाखवू शकेल. जेव्हा मी लोकांमध्ये सिक्स पॅक अॅब्सबद्दलचे वेड पाहतो तेव्हा मला खूप वाईट वाटतं. आमिरला पाहा, तो 'धूम ३'मध्ये किती फिट होता आणि 'दंगल'मध्ये किती लठ्ठ होता." हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री झळकणार ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत; दिसणार ‘या’ भूमिकेत पुढे अभिषेक म्हणाला की, "आजकालच्या तरुण कलाकारांना सिक्स पॅक अॅब्स बनवून अभिनेता होण्याची इच्छा आहे. पण भावांनो, भाषेवर लक्ष द्या आणि अभिनय कौशल्यावर काम करा. बॉडीमुळे नाही तर या गोष्टींमुळे अभिनेता होता येते." अभिषेकच हे विधान सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. हेही वाचा - ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप; शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचे कलाकारांनी फोटो केले शेअर दरम्यान, अभिषेकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच तो आर बाल्किच्या 'घूमर' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तो सैयामी खेरबरोबर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. १८ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.