प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी फेब्रुवारी महिन्यात भारतीय क्रिकेटपट्टू के.एल.राहुलबरोबर लग्नाच्या बेडीत अडकली. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्यावर अथिया व के.एल.राहुलचा शाही विवाहसोहळा पार पडला. अनेक वर्ष डेट केल्यानंतर अथियाने के.एल.राहुलशी विवाह केला. अथियानंतर आता तिचा भाऊ व सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीशी प्रेमात पडला आहे. अहान फॅशन डिझायनर तानिया श्रॉफला डेट करत आहे. नुकताच तानियाचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यात आला. तिच्या वाढदिवस पार्टीतील व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अहान व तानियाला एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. इन्स्टंट बॉलिवूडने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये अहान तानियाबरोबर पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर अहान व तानियाच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा रंगू लागल्या आहेत. हेही वाचा>> प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याला श्रीदेवींबरोबर डेटवर जायचं होतं पण…; खुलासा करत म्हणाला “मी…” हेही वाचा>> Big Bang Theory: माधुरी दीक्षितला “वेश्या” म्हणणाऱ्या अभिनेत्याला जया बच्चन यांनी सुनावलं, म्हणाल्या “त्याला..” अहानने २०२१ साली 'तडप' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अहान व तानिया बालपणापासून मित्र आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत.