scorecardresearch

सातत्याने फ्लॉप होणाऱ्या चित्रपटांवर अखेर अक्षय कुमारने सोडलं मौन; म्हणाला…

मागच्या वर्षी आलेल्या चित्रपटांपैकी अक्षय कुमारचा एकही चित्रपट हिट ठरला नाही

akshay kumar selfiee teaser 2
फोटो : सोशल मीडिया

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार, खिलाडीप्रमाणे बॉलिवुडमधील सर्वात महागडा कलाकार अशी त्याची ओळख आहे. नुकताच त्याचा ‘सेल्फी’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कामगिरी करू शकला नाही. आजवर अक्षयने बरेच चित्रपट सुपरहिट करून दाखवले आहेत मात्र तितकेच फ्लॉप चित्रपटदेखील दिले आहेत. नुकतेच त्याने चित्रपट फ्लॉप होण्यावर भाष्य केलं आहे.

अक्षय कुमार सातत्याने चर्चेत येत असतो. सेल्फी चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याने एका मुलाखतीत फ्लॉप चित्रपटांबद्दल आणि त्याने कबूल केले आहे यासाठी केवळ तोच दोषी आहे. आजतकला दिलेल्या मुलाखतीत तो असं म्हणाला, “माझ्याबरोबर हे काही पहिल्यांदा घडलेले नाहीत. एक काळ असा होता की माझे एकामागून एक १६ चित्रपट फ्लॉप चालले नाहीत. चित्रपट चालत नाही ही तुमचीच चूक आहे. प्रेक्षक बदलले आहेत आणि तुम्हालाही बदलून पुन्हा काम करावे लागेल. तुमची ओळख पुसून तुम्हाला नव्याने ओळख निर्माण करावी लागेल. कारण प्रेक्षकांना काहीतरी वेगळे पाहण्याची आवश्यकता आहे.”

आयकर विभागाच्या धाडी पडू नये म्हणून अक्षय कुमार आजही वडिलांनी दिलेला ‘हा’ सल्ला पाळतो

या मुलाखतीत त्याने कॅनडाच्या नागरिकत्वावरदेखील भाष्य केलं आहे. ९० च्या दशकात त्याचे चित्रपट चालत नव्हते म्हणून त्याने कॅनेडियन नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. असे ही त्याने सांगितले मात्र त्याचे २ चित्रपट सुपरहिट ठरले आणि त्याने इथेच थांबण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मीचा ‘सेल्फी’ २४ फेब्रुवारीला ‘प्रदर्शित झाला आहे. यांच्याबरोबरच नुशरत भरूचा, डायना पेंटि या अभिनेत्रीसुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसेच अक्षय आता ‘हेराफेरी ३’ आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटांवर काम करत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-02-2023 at 10:47 IST
ताज्या बातम्या