bollywood actor anupam kher meet kangana ranaut and shared photo on social media spg 93 |"चित्रपटाचा सेट किंवा..." कंगनाबरोबरच्या भेटीनंतर अनुपम खेर यांची पोस्ट चर्चेत | Loksatta

“चित्रपटाचा सेट किंवा…” कंगनाबरोबरच्या भेटीनंतर अनुपम खेर यांची पोस्ट चर्चेत

अनुपम खेर अनेक दिग्गज व्यक्तींच्या भेटी घेत असतात, सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहतात

“चित्रपटाचा सेट किंवा…” कंगनाबरोबरच्या भेटीनंतर अनुपम खेर यांची पोस्ट चर्चेत
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अनुपम खेर यांचा चाहता वर्ग मोठा आहे. बिग बी अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत असलेला ‘ऊंचाई’ या चित्रपटात अनुपम खेर यांनीही महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले. अनुपम खेर बॉलिवूडमधील दिग्ग्ज अभिनेत्यांपैकी एक आहेत. ज्यांनी आजवर वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. नुकतीच त्यांनी कंगना रणौतची भेट घेतली आहे.

अनुपम खेर सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. राजकीय सामाजिक मुद्द्यांवर ते भाष्य करत असतात. नुकतेच त्यांनी कंगना बरोबरच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. ज्यात ते असं म्हणालेत “तुला भेटून कायमच आनंद होतो मग ती भेट चित्रपटाच्या सेटवर असो किंवा विमानतळावर…” अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राणा दग्गुबाती भारतातील प्रसिद्ध विमान कंपनीवर संतापला; ट्वीट करत म्हणाला…

अनुपम खेर सध्या चर्चेत आहेत. इस्रायलच्या दिग्दर्शकाने ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर टीका केल्याने ते साहजिकच नाराज झाले होते. अनुपम खेर यांची ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटात महत्वाची भूमिका होती. यात त्यांनी काश्मिरी पंडित साकारले होते.

अनुपम खेर लवकरच कंगनाच्या ‘इमर्जन्सी चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्याबरोबरीने अभिनेता श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण यांसह अभिनेत्री महिमा चौधरी महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहे. कंगना अभिनयाच्याबरोबरीने या चित्रपटाचे स्वतः दिग्दर्शनदेखील करत आहे

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 18:25 IST
Next Story
आमिर खानने केलेलं ‘या’ मुकपटात काम; नीना गुप्ता होत्या प्रेयसीच्या भूमिकेत तर आलोक नाथ यांनी साकारला खलनायक