बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर मागील ४० वर्षांपासून बॉलीवूडमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी ५०० हून जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये मानधन घेणारे अनुपम खेर आताही भाड्याच्या घरात राहतात. कोट्याधीश असलेल्या अनुपम खेर यांचं स्वतःचं घर नाही, असा खुलासा त्यांनी केला आहे.

‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर म्हणाले, “मी भाड्याच्या घरात राहतो, कारण मी ठरवलं की मला घर घ्यायचं नाही. घर कोणासाठी घ्यायचं? त्यापेक्षा दर महिन्याला भाडं द्यायचं आणि जगायचं. ज्या पैशांनी तुम्ही घर खरेदी करणार आहात, ते पैसे तुमच्या बँक खात्यात ठेवा आणि त्यातून घराचं भाडं द्या.”

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा – “तीन दिवस…”, ‘राजा हिंदुस्तानी’तील आमिर खान-करिश्मा कपूरच्या किसिंग सीनबाबत दिग्दर्शकाचा मोठा खुलासा

अनुपम खेर पुढे म्हणाले, “मेल्यानंतर तुमच्या घरासाठी लोकांनी भांडावं, त्यापेक्षा पैसे वाटून दिलेले बरे. मी फक्त माझ्या आईसाठी शिमल्यात एक घर विकत घेतलंय. कारण सात वर्षांपूर्वी एकदा तिला मी चिडवत होतो की मी एक मोठा स्टार आहे. त्यामुळे तिला काय हवंय ते तिने सांगावं. मला वाटलं ती काहीच नको म्हणेल, पण ती लगेच म्हणाली, ‘मला शिमल्यात घर हवं आहे’. मी तिला विचारलं की माझ्या वडिलांच्या निधनानंतर आपण तिथे राहत नाही म्हणून का? पण ती आयुष्यभर भाड्याच्या घरात राहिली, म्हणून तिला स्वतःचं घर हवं होतं.”

हेही वाचा- Video: एकाच मालिकेतील तिसऱ्या अभिनेत्रीने दिली गुड न्यूज, लग्नानंतर ५ वर्षांनी होणार आई

आईसाठी घेतलं घर

आईची इच्छा पूर्ण केली आणि शिमल्यात घर घेतलं, असं खेर यांनी सांगितलं. “तिला एका बेडरूमचं घर हवं होतं, पण मी तिच्यासाठी आठ बेडरूमचं घर घेतलं. जेव्हा ती काही महिन्यांसाठी तिथे जाते तेव्हाही तिला विज बिलाची काळजी असते, त्यामुळे सर्व खोल्यांच्या लाइट्स बंद करते,” असं खेर म्हणाले.

किरण खेर यांच्या मताबद्दल अनुपम म्हणाले…

अनुपम खेर यांना त्यांच्या पत्नी, अभिनेत्री किरण खेर यांचंही घराबाबत असंच मत आहे का? असं विचारण्यात आलं. ते म्हणाले, “तिला थोडा वेळ लागला, पण आता ठीक आहे. तिचं चंदीगडमध्ये स्वतःचं घर आहे.”

हेही वाचा – लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर

अनुपम खेर यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्यांचा ‘विजय 69’ चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षय रॉयने केले आहे. या चित्रपटात चंकी पांडे आणि मिहिर आहुजा हे कलाकारही आहेत. या चित्रपटातील भूमिकेसाठी अनुपम खेर यांचं खूप कौतुक होत आहे.

Story img Loader