scorecardresearch

“पुन्हा प्रपोगंडा चित्रपट…” ‘द व्हॅक्सीन वॉर’ चित्रपटातील भूमिकेवरून अनुपम खेर ट्रोल

हा चित्रपट वैज्ञानिकांची एक प्रेरणादायी कथा सांगेल ज्यांनी वैद्यकीय पायाभूत सुविधांशिवाय जगातील सर्वात सुरक्षित लस तयार केली.

“पुन्हा प्रपोगंडा चित्रपट…” ‘द व्हॅक्सीन वॉर’ चित्रपटातील भूमिकेवरून अनुपम खेर ट्रोल
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अनुपम खेर यांचा चाहता वर्ग मोठा आहे. बिग बी अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत असलेला ‘ऊंचाई’ या चित्रपटात अनुपम खेर यांनीही महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले. आता लवकरच ते दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या बहुचर्चित ‘द वॅक्सीन वॉर’ या चित्रपटात झळकणार आहेत.

अनुपम खेर गेली अनेकवर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. आपल्या करियरमध्ये त्यांनी अनेक भूमिका साकारल्या आहेत. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या द काश्मीर फाइल्स चित्रपटात त्यांनी काम केले होते. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे कौतुकदेखील झाले. आता ते ‘वॅक्सीन वॉर’ चित्रपटात दिसणार आहेत. त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत माहिती दिली. “माझ्या ५३४ चित्रपटाची घोषणा करत आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द व्हॅक्सीन वॉर’ प्रेरणादायी जय हिंद!” अशा शब्दात त्यांनी कॅप्शन दिला आहे.

‘धर्मवीर’नंतर प्रसाद ओक साकारणार ‘या’ दिग्गज नटाची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला…

अनुपम खेर यांच्या पोस्टनंतर पोस्टनंतर नेटकऱ्यांनी मात्र त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे. एकाने लिहले आहे “पुन्हा एकदा प्रपोगंडा चित्रपटात दिसणार” तर दुसऱ्याने लिहले आहे, “एक चित्रपट केल्यानंतरदेखील मन भरल नाही का?” असा थेट प्रश्न त्याने विचारला आहे.

“मी रिक्षातून जाताना त्याने माझा…” यामी गौतमने सांगितला ‘तो’ धक्कादायक प्रसंग

‘द काश्मिर फाइल्स’च्या घवघवीत यशानंतर विवेक रंजन अग्निहोत्री आणखी एक अनोखा विषय घेऊन येत असल्याने प्रत्येक भारतीय प्रेक्षकाला उत्सुकता लागली आहे. शिवाय हा विषय करोना काळातील लसीकरणाच्या मोहिमेसंदर्भात असल्याने या विषयाला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. ‘द व्हॅक्सिन वॉर’ असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट वैज्ञानिकांची एक प्रेरणादायी कथा सांगेल ज्यांनी वैद्यकीय पायाभूत सुविधांशिवाय जगातील सर्वात सुरक्षित लस तयार केली.

विवेक रंजन अग्निहोत्री यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर’हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट २०२३ रोजी दर्शकांच्या भेटीला सज्ज झाला असून, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, मराठी आणि बंगाली यासह १० हून अधिक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच, या चित्रपटाची निर्मिती पल्लवी जोशी यांनी केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-01-2023 at 14:59 IST

संबंधित बातम्या