Arun Bali Death News : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे आज (७ ऑक्टोबर) निधन झाले. ते ७९व्या वर्षांचे होते. पहाटे ४.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘फूल और अंगारे’, ‘खलनायक’, ‘3 इडियट्स’, ‘केदारनाथ’ आणि ‘पानिपत’यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत अरुण बाली यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण योगायोग म्हणजे आजच त्यांचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

अरुण बाली यांचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित

First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटामध्ये अरुण बाली शेवटचे दिसले. त्यानंतर आता त्यांचा आज ‘गुडबाय’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. फॅमिली ड्रामा असलेल्या या चित्रपटामध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका आहे. तसेच अभिनेत्री रश्मिका मंदानाने या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. अरुण बाली यांच्या निधनाच्या दिवशीच चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

गंभीर आजारामुळ त्रस्त होते अरुण बाली
अरुण बाली यांच्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून अरुण बाली यांना मायस्थेनिया ग्रॅव्हिस नावाचा गंभीर आजार झाला होता. या आजारामध्ये नसा आणि स्नायू यांच्यामध्ये विशिष्ट प्रकारचा अडथळा निर्माण होतो. काही महिन्यांपूर्वी त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं. पण आज मुंबईमध्येच पहाटे ४.३० वाजता अरुण बाली अखेरचा श्वास घेतला.

आणखी वाचा – Arun Bali Passes Away: ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

अरुण बाली यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटी तसेच चाहते मंडळींनी आपल्या लाडक्या कलाकाराला सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. ‘सौगंध’, ‘यलगार’, ‘राजू बन गया जेंटलमैन’, ‘खलनायक’, ‘राम जाने’, ‘पुलिसवाला गुंडा’, ‘सबसे बड़ा खिलाड़ी’, ‘सत्या’, ‘शिकारी’, ‘हे राम’, ‘आंखें’, ‘जमीन’, ‘अरमान’ या चित्रपटात काम केले. विशेष म्हणजे ‘लगे रहो मुन्ना भाई’, ‘3 इडियट्स’, ‘बर्फी’, ‘ओह माय गॉड’, ‘पीके’, ‘एयरलिफ्ट’, ‘बागी’, ‘केदारनाथ’, ‘पानीपत’ अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.