Bollywood Actor On Govinda’s Downfall : बॉलीवूड अभिनेता गोविंदा आपल्या खासगी आणि वैयक्तिक आयुष्यामुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे. तसेच सोशल मीडियावर त्याच्या डाऊनफॉलच्यादेखील चर्चा होत आहेत. गोविंदा काही स्क्रिप्टवर काम करत असल्याचे त्याच्या मॅनेजरने काही दिवसांपूर्वी सांगितले होते; पण त्याचा नवीन प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीला कधी येतोय, याची चाहते वाट पाहत आहेत.
काही दिवसांपूर्वी गोविंदा काही छोट्या कार्यक्रमांमध्ये परफॉर्मन्स करताना दिसला होता. त्यावरून काहींनी अभिनेत्याच्या आर्थिक परिस्थितीवरही प्रश्न उपस्थित केले होते. अशातच यावर आता गोविंदाचे सहकलाकार व अभिनेते अश्विन कौशल यांनी गोविंदाच्या डाऊनफॉलबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अश्विन कौशल यांनी अनेक वर्षे विविध सिनेमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘पीके’, ‘जवान’ व ‘गुलाम’ यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. गोविंदाबरोबरही त्यांनी काम केले आहे. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अश्विन कौशल यांनी गोविंदाच्या अपयशाबद्दल सांगितले.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “गोविंदाच्या डाऊनफॉलचं एकमेव कारण म्हणजे त्याच्या मनातील भ्रम. याच गोष्टीमुळे त्याचं वागणं आणि त्याचा ॲटीट्यूड असं सगळंच बदललं. नाही तर गोविंदासारख्या अभिनेत्याला कोणी रोखू शकलं असतं का? पण अजूनही वेळ गेलेली नाही. तो काही ९० वर्षांचा झालेला नाही. कोणीतरी त्याला यातून बाहेर काढावं आणि एखादी दमदार भूमिका द्यावी, अशी माझी प्रार्थना आहे.”
“गोविंदाच्या रूपात कादर खान जिवंत आहेत”
पुढे ते म्हणाले, “गोविंदाच्या रूपात आजही कादर खान जिवंत आहेत. कादर खान यांनी त्यांना ‘तथास्तु’ असा आशीर्वाद दिला आहे. ते त्या काळची कला जिवंत ठेवू शकतात; पण त्याच्या मनातील भ्रमामुळे सगळ्या गोष्टी बिघडल्या. लोकांबद्दल बोलायचं झालं’ तर ते बोलणारच. त्यांचं कामच आहे ते. लोक राजेश खन्ना यांच्याबद्दलही असंच बोलायचे.”
“गोविंदा पुन्हा एकदा सुपरस्टार होऊ शकतो”
याबद्दल ते पुढे म्हणाले, “लोक राजेश खन्ना यांच्याबद्दलसुद्धा काही ना काही बोलायचेच. पण राजेश खन्नांसारखे स्टारडम पुन्हा कधीच पाहायला मिळणार नाही. अमिताभ बच्चन यांनीही ते स्टारडम पाहिलं नाही. जे स्थान वर ईश्वराचं आहे, तेच खाली राजेश खन्नांचं होतं. गोविंदालाही तसं स्टारडम मिळवता आलं असतं; पण त्याच्या काही निर्णयांनी तो मागे राहिला. तरीही गोविंदानं मनावर घेतलं तर तो उद्या पुन्हा आपला सुपरस्टार हा टॅग परत मिळवू शकतो, हे मी ऑन रेकॉर्ड सांगतोय.”
“गोविंदावर लोक जळायचे, आजही जळतात”
त्यानंतर अश्विन यांनी गोविंदाच्या कामाच्या पद्धतीबद्दल ते म्हणाले, “गोविंदावर लोक जळायचे, आजही जळतात. अनेक सुपरस्टार्सना त्याची भीती वाटायची. ती आजही वाटते; पण गोविंदा बऱ्याचदा ज्योतिष आणि ग्रहांच्या योगावर विश्वास ठेवायचा. जर त्याला वाटले की, आजचा दिवस किंवा वेळ शुभ नाही, वाजता तर तो सेटवर यायचाच नाही. मी त्यांच्याबद्दल असं ऐकलं होतं की, तो खूप अंधश्रद्धाळू झाला होता, जे त्याच्या स्वभावाच्याच्या विरुद्ध होतं
