बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर मागच्या महिन्यात गोळीबार झाला. यातून तो थोडक्यात बचावला. त्याच्यावर गोळीबार करणाऱ्यांना आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान आता अभिनेता आयुषमान खुरानालाही धमकी आली आहे. बॉलिवूड कलाकारांना बिश्नोई गँगच्या नावाने येणाऱ्या धमक्यांचे सत्र सुरूच आहे. अभिनेता आयुष्मान खुरानाला लॉरेन्स गँगच्या नावाने धमकीचा ऑडिओ मेसेज आल्याची माहिती समोर आल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. या प्रकरणी ऑडिओ क्लिप समोर आली आहे. ही धमकीही बिश्नोई गँगकडून बोलतो आहे असं या क्लिपमध्ये सांगण्यात आलं आहे.

आयुषमान खुरानाकडे कोट्यवधी रुपयांची मागणी

अभिनेता आयुषमान खुरानाला देखील धमकीचा ऑडिओ क्लिप मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ऑडिओ क्लिपमधील व्यक्तीने आपण लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. आयुषमान खुराणाकडे कोट्यवधी रुपयांची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने सांगितलेल्या नावाचा आवाज पोलिसांकडील रेकॉर्डमधील ऑडिओशी जुळवण्याचे काम सुरु आहे. यापूर्वी अभिनेता तुषार कपूरलाही हॅरी बॉक्सरच्या नावाने धमकीचा ऑडिओ मेसेज आला होता. मात्र तुषार कपूर प्रकरणातील ऑडिओ प्राथमिक तपासात बनावट असण्याची शक्यता वर्तवण्यात आली.

तुषार कपूरलाही धमकी

धमकी देणाऱ्या व्यक्ती किंवा टोळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तपासणी सुरू. अभिनेता तुषार कपूर याला लॉरेन्स गँगचा सदस्य हॅरी बॉक्सर याच्या नावाने फोन आल्याची माहिती समोर येत असून, तुषार कपूर याच्याकडे तब्बल ५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली. मुंबईतील जुहू येथे १८ ऑक्टोबर रोजी अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई क्राइम ब्रँचने कसून चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, रणबीर कपूर याच्या घरावर देखील हल्लेखोरांनी लक्ष ठेवले होते. त्याच्या वांद्र्याच्या पाली हिल येथील निवासस्थानाची आरोपींनी रेकी केल्याचं तपासत निष्पन्न झालं. आता तुषार कपूर आणि त्यानंतर आयुषमान खुराना या दोघांनाही धमकी आली आहे.