९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेते दीपक तिजोरी आता मोठ्या पडद्यापासून दूर आहेत. एकेकाळी हिरोआधी त्याच्या मित्र किंवा भावाच्या भूमिकेसाठी निर्माते दीपक तिजोरी यांना घ्यायचे. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सहाय्यक भूमिका करून लोकांच्या हृदयावर राज्य केले आहे. दीपक तिजोरी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म २८ ऑगस्ट १९६१ रोजी मुंबईत झाला. ते ६३ वर्षांचे झाले आहेत. त्यांना सहायक भूमिका करून इंडस्ट्रीत हिरोसारखे यश मिळाले. असं असलं तरी त्यांचं करिअर फार यशस्वी राहिलं नाही.
दीपक तिजोरी यांचे शिक्षण मुंबईत झाले. त्यांना अभिनयाची आवड होती म्हणून त्यांनी महाविद्यालयीन जीवनातच थिएटर करायला सुरुवात केली. या काळात त्यांनी खूप संघर्ष केला. चित्रपटात येण्यापूर्वी त्यांनी एका मॅजझीनमध्ये एक्झिक्युटिव्ह आणि मुंबईतील ‘सी रॉक’ हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणूनही काम केलं. त्यांनी १९८८ मध्ये आलेल्या ‘तेरा नाम मेरा नाम’ या सिनेमातून करिअरला सुरुवात केली. मात्र, महेश भट्ट यांच्या ‘आशिकी’ चित्रपटातून या त्यांना नाव आणि प्रसिद्धी दोन्ही मिळाले. यानंतर त्यांनी ‘दिल है की मानता नहीं’, ‘सडक’, ‘खिलाडी’, ‘बेटा’, ‘जो जीता वही सिकंदर’, ‘बादशाह’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. आपल्या ३४ वर्षांच्या कारकिर्दीत दीपक तिजोरी १३ वर्षे चित्रपटांपासून दूर राहिले आणि २१ वर्षात २० पेक्षा जास्त फ्लॉप चित्रपट दिले.
दीपक तिजोरी यांनी इंडस्ट्रीत खूप नाव कमावले आहे. त्यांनी क्वचितच मुख्य भूमिका साकारल्या. त्यांना मिळालेल्या बहुतांशी भूमिका या हिरोच्या मित्राच्या किंवा भावाच्या होत्या. ते एकाच प्रकारच्या भूमिकेत अडकून राहिले. काही काळानंतर त्यांचे करिअर हळूहळू संपले.
प्रोडक्शन हाऊसमधून करतात कमाई
दीपक तिजोरी हे निर्माते आणि दिग्दर्शकही आहेत. त्यांचे तिजोरी फिल्म्स नावाचे प्रोडक्शन हाऊस आहे. या बॅनरखाली त्यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांची निर्मिती केली आहे. त्यांची एक मालिका ‘रिश्ते’ खूप हिट झाली. तिजोरी यांनी ‘उप्स’, ‘फरेब’ आणि ‘खामोश: खौफ की रात’ सारखे चित्रपटही दिग्दर्शित केले, पण ते फ्लॉप ठरले.
दीपक तिजोरी यांची नेट वर्थ
दीपक तिजोरी यांचे मुंबईत कोट्यवधींचे घर आहे आणि तसेच त्यांच्याकडे अनेक मालमत्ता आहेत, ज्याची किंमत सुमारे ३६ कोटी २० लाख रुपये आहे. २०२० मध्ये त्यांची एकूण संपत्ती ५८ कोटी ७४ लाख रुपये होती, जी आता ८० कोटींहून अधिक झाली आहे.