Hema Malini On Dharmendra Padma Vibhushan Award : ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांना कला क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. धर्मेंद्र यांना पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर त्यांची पत्नी व अभिनेत्री हेमा मालिनी यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

धर्मेंद्र यांना पद्म विभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल हेमा मालिनींनी आनंद व्यक्त केला. पण त्यांच्या महान कार्यासाठीची ओळख त्यांना आणखी लवकर मिळायला हवी होती, असंही म्हटलं. ANI शी साधलेल्या संवादात त्यांनी हा सन्मान फक्त कुटुंबासाठीच नव्हे; तर संपूर्ण देशासाठी आनंदाचा क्षण असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

हेमा मालिनी म्हणाल्या, “धर्मेंद्र यांना पद्म विभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे. यामुळे संपूर्ण देश आनंदी आहे. पण हा पुरस्कार लवकर मिळाला असता, तर धर्मेंद्र यांनादेखील आनंद झाला असता. तसंच त्यांचे अनेक चाहतेसुद्धा यामुळे खुश झाले असते.”

पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर रविवारी हेमा मालिनी यांनी X वरही धर्मेंद्र यांच्यासाठी एक भावुक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं, “सरकारने धर्मजींच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाची दखल घेत त्यांना प्रतिष्ठित पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित केल्याचा मला खूप अभिमान वाटतो.”

दरम्यान, बॉलीवूडचे ही-मॅन म्हणून धर्मेंद्र यांची ओळख होती. त्यांनी शोला और शबनम’, ‘अनपढ’, ‘शादी’, ‘बंदिनी’, ‘फुल और पत्थर’, ‘मेरा नाम जोकर’सारख्या सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीला आले. ‘ड्रीम गर्ल’, ‘सीता और गीता’, ‘चुपके चुपके’ या सिनेमातल्या त्याच्या भूमिकाही खास गाजल्या. त्यांचा ‘इक्कीस’ हा शेवटचा सिनेमा गेल्या महिन्यात जानेवारीमध्ये प्रदर्शित झाला होता.

२०१२ मध्ये सिनेसृष्टीतल्या कारकिर्दीबाबत पद्म भूषण पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं होतं. अशातच आता त्यांना मरणोत्तर पद्म विभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. दरम्यान,