Govinda Responds Viral Small Event Dance : बॉलीवूड अभिनेता गोविंदा अनेकदा आपल्या खासगी आणि वैयक्तिक आयुष्यामुळे गेले काही दिवस चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये तो एका शाळेच्या कार्यक्रमात डान्स करताना दिसला होता. त्यानंतर सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू झाल्या. काहींनी तर त्याच्या आर्थिक परिस्थितीवरही प्रश्न उपस्थित केले. आता या सर्व चर्चांवर गोविंदाने एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे.

महिनाभरापूर्वी गोविंदा खासगी कार्यक्रमांमध्ये आणि एका शाळेच्या कार्यक्रमात डान्स करताना दिसला होता. त्याची ती अवस्था पाहून सोशल मीडियावर त्याला पैशांची गरज असल्याने तो अशा कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. तसंच आणखी एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यात अभिनेता महागड्या गाडीऐवजी एका साध्या गाडीतून प्रवास करताना दिसला. यामुळे अभिनेत्यावर वाईट वेळ आल्याच्या प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. अशातच त्यावर अभिनेत्याने स्वत:च स्पष्टीकरण दिलं आहे.

शाळेच्या कार्यक्रमातील डान्सबद्दल दिलं स्पष्टीकरण

गोविंदाने अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत डान्सच्या व्हायरल व्हिडीओबद्दल आणि त्यावर झालेल्या चर्चांबद्दल स्पष्ट मत व्यक्त केलं. तो म्हणाला, “लोक ज्या कार्यक्रमांना ‘लहान शो’ म्हणत आहेत, त्यापैकी एक कार्यक्रम एका मुख्यमंत्र्यांशी संबंधित होता आणि दुसरा एका खासदाराचा होता. आज सोशल मीडिया कोणाच्याही नियंत्रणात नाही आणि अनेकदा अशा अफवा पसरवल्या जातात. त्याबद्दलचं सत्य जाणून न घेता चर्चा होतात.”

Award Banner

लहान गाडीतून प्रवास केल्याच्या चर्चेवरही दिलं उत्तर

आग्रामध्ये एका लहान गाडीत फिरल्याच्या बातम्यांवरही गोविंदाने स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला, “तिथे फक्त तीच गाडी वापरण्याची परवानगी असते. तुमची मर्सिडीज बाहेरच पार्क करावी लागते, कारण तिथे तोच नियम आहे. त्यामुळे त्याचा माझ्या लाइफस्टाइलशी काहीही संबंध नाही.

पुढे गोविंदा म्हणाला, “तो अशाप्रकारच्या टीका किंवा अफवा मनावर घेत नाही. ज्यावेळी सोशल मीडियावर त्याच्या गाडीबद्दल चर्चा सुरू होती, त्यावेळी मी विमानात प्रवास करत होता आणि सहप्रवाशांनी त्याला सरप्राइज देत ‘हॅप्पी बर्थडे’ गाणे गाऊन शुभेच्छा दिल्या होत्या.”

तो म्हणाला, “आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल मी देवाचा आभारी आहे. देवाने मला खूप काही दिलं आहे. नकारात्मक बोलणाऱ्यांकडे मी लक्ष देत नाही आणि या सर्व गोष्टींमागे कोणतीही नाराजी नाही. देवाने खूप काही दिलं आहे आणि मी खूप आनंदात आहोत.”