बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन व सुझान खान यांनी २०१४ मध्ये घटस्फोट घेतला. १३ वर्षांच्या सुखी संसारानंतर दोघांनी विभक्त व्हायचं ठरवलं. आता घटस्फोट होऊन बरीच वर्षे झाली आहेत. तसंच आता दोघांना नवे जोडीदार देखील भेटले आहेत. पण तरीही कोणताही कार्यक्रम असो, त्यामध्ये हृतिक व सुझान एकत्र दिसतात. हृतिक व सुझानला दोन मुलं आहेत. त्यांचा मोठा मुलगा रेहान नुकताच पदवीधर झाला. हा अभिमानस्पद क्षण पाहण्यासाठी हृतिक व सुझान खास एकत्र उपस्थित राहिले होते. याचा व्हिडीओ सुझानने चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.

“‘आम्ही कुठे जाऊ हे कोणास ठाऊक नाही…पण मला हे सांगायचं आहे की, मी माझा वाटेवर आहे…’ माझ्या मुला अभिनंदन. मी तुझ्याकडून रोज शिकते. तुझी आई असल्याचा मला अभिमान आहे. रेहान तुझ्या आयुष्यातील छान दिवसांची ही सुरुवात आहे”, असं कॅप्शन लिहित सुझानने लेकाच्या पदवी प्रदान समारंभाचा व्हिडीओ शेअर केला आहे. आपल्या मुलाला शुभेच्छा आणि प्रोत्साहन देण्यासाठी हृतिक व सुझानने पदवी प्रदान समारंभाला एकत्र हजेरी लावली होती. या व्हिडीओमध्ये एकत्र कुटुंबाचे फोटो देखील पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा – Video: ठरलं! ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार समीर परांजपे, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’चा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित

हेही वाचा – Video: रुग्णालयात राखी सावंतवर झालेला जीवघेणा हल्ला, शस्त्रक्रियेनंतर ‘अशी’ झालीये तिची अवस्था, पहिल्या पतीने दिली माहिती

सुझानने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक कलाकारांसह चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच तिचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनीने रेहानला शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी व्हिडीओवर लिहिलं आहे, “अभिनंदन रेहान. ही फक्त सुरुवात आहे. अजून बऱ्याच संधी येणं बाकी आहेत.”

दरम्यान, हृतिक व सुझानच्या दुसऱ्या मुलाचं नाव रिदान असं आहे. घटस्फोट झाला असला तरी दोन्ही मुलांचा सांभाळ दोघं एकत्र मिळून करतात. सुझानप्रमाणे हृतिक देखील अभिनेत्री, गायिका सबा अजादबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. बऱ्याच सार्वजनिक व कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये हृतिक सबाबरोबर पाहायला मिळतो.

हेही वाचा – अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये ‘वाका- वाका’ फेम शकिरा करणार परफॉर्म! गायिकेचं मानधन वाचून व्हाल थक्क

हृतिकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो ‘वॉर २’ या आगामी चित्रपटाचं सध्या काम करत आहे. या चित्रपटात हृतिकसह दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर झळकणार आहे. तसंच अभिनेत्री कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. याआधी हृतिक सिद्धार्थ आनंदच्या ‘फायटर’ चित्रपटात दिसला होता.