scorecardresearch

सौदीमध्ये हृतिक रोशनने घालवला पाकिस्तानी अभिनेत्रीबरोबर वेळ; घेतला रुचकर जेवणाचा आस्वाद

हृतिक रोशन सध्या त्याची कथित गर्लफ्रेंड सबा आझादबरोबरच्या नात्यामुळे चर्चेत असतो

सौदीमध्ये हृतिक रोशनने घालवला पाकिस्तानी अभिनेत्रीबरोबर वेळ; घेतला रुचकर जेवणाचा आस्वाद
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

अभिनेता हृतिक रोशन हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सध्या सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे ती त्याच्या आगामी ‘फायटर’ या चित्रपटाची. या चित्रपटाची घोषणा गेल्या वर्षीच करण्यात आली होती, तेव्हापासूनच त्याचे चाहते या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक आहेत. हृतिक त्याच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतो. नुकताच तो एका पाकिस्तानी अभिनेत्रीबरोबर दिसला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉलिवूडचा ग्रीक गॉड म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे हृतिक रोशन, पत्नी सुझानबरोबर घटस्फोट झाल्यानंतर चांगलाच चर्चेत आला आहे. नुकतीच त्याने सौदी अरेबिया येथे सुरु असलेल्या रेड सी चित्रपट महोत्सवामध्ये हजेरी लावली. या महोत्सवामध्येअनेक देशांतील कलाकारांनी सहभाग घेतला होता. हृतिक पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानबरोबरच व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये हृतिक आणि माहिरा टेबलावर एकत्र बसून संवाद साधताना दिसत आहेत.

Photos : कोण आहे रिया चक्रवर्तीचा बॉयफ्रेंड, विराट कोहलीशी आहे खास कनेक्शन

हृतिक रोशन सध्या त्याची कथित गर्लफ्रेंड सबा आझादबरोबरच्या नात्यामुळे चर्चेत असतो. दोघेही कोणत्या ना कोणत्या पार्टीत फिरताना दिसतात. जरी, दोघांनी अद्याप त्यांचे नाते अधिकृतपणे स्वीकारले नाही, परंतु तरीही दोघेही फोटोंमधून आपल्या नात्याबद्दल सांगत असतात.

दरम्यान दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेला ‘फायटर’ हा चित्रपट भारतातील पहिला एरियल अ‍ॅक्शन चित्रपट आहे. भारताच्या सशस्त्र दलांना मानवंदना देणारा हा चित्रपट २०२४ साली प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 12:35 IST

संबंधित बातम्या