John Abraham On Abhishek Bachchan : बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहमने इंडस्ट्रीत विविध प्रकारच्या भूमिका साकारून स्वतःचं स्थान निर्माण केले आहे. खूप संघर्ष करत जॉन अब्राहमने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत जॉनने त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितले आणि आउटसायडर कलाकारांसाठी इंडस्ट्रीत टिकून राहणे किती कठीण होते, याबद्दलही सांगितलं.

जॉनने सांगितले की, मनोरंजन क्षेत्रात येण्याची कुठलीच पार्श्वभूमी नसल्यामुळे सुरुवातीला त्याला इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.

SCREEN मास्टरक्लासमध्ये बोलताना जॉनने सांगितलं की, २००३ मध्ये जेव्हा त्याने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. तेव्हा इंडस्ट्रीत माझ्यासारखे बाहेरून आलेले कलाकार खूप कमी होते. त्यापूर्वी फक्त अक्षय कुमार आणि शाहरुख खानच होते. कुणीही गॉडफादर नसताना दोघांनी या इंडस्ट्रीत त्यांचं स्थान निर्माण केलं.

जॉन म्हणाला, “माझ्या काळात मी जितकी टीका सहन केली, ती कदाचित इतर कोणालाही सहन करावी लागली नसेल.” यानंतर तो म्हणाला, “मी कधीही मीडियामध्ये स्वतःला ओळख देण्याचा प्रयत्न केला नाही. मी नेहमी प्रामाणिकपणे माझं काम केलं.”

मी अभिषेक बच्चनला किस केलं

जॉनने वरुण धवन, अभिषेक बच्चन आणि इतर सहकलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभवही शेअर केला. हसत हसत तो म्हणाला, “मी अभिषेक बच्चनला ऑनस्क्रीन किसही केला आहे. मी कधीच कोणाशी स्पर्धा केली नाही. सहकलाकारांबरोबर काम करताना मी नेहमीच मैत्री ठेवली.”

जॉन अब्राहम आगामी कामाबद्दल…

जॉन अब्राहमच्या आगामी कामाबद्दल सांगायचं झाले तर, ‘विलेनगिरी’नंतर तो सध्या कॉमेडी चित्रपटाच्या शोधात आहेत. तसंच त्याने ‘नो स्मोकिंग’चा सिक्वेल आला तर त्यात काम करायला आवडेल, असंही म्हटलंय. तसंच जॉन लवकरच ‘फोर्स’ या चित्रपटाची सीरिज पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. याशिवाय, तो आधुनिक महाभारत कथानकावर आधारित चित्रपटात दुर्योधनची भूमिका साकारणार आहे.

तसेच, काही वृत्तांनुसार जॉन दिग्दर्शक रोहित शेट्टीबरोबर माजी मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये काम करणार आहे, अशीही चर्चा आहे.