कार्तिक आर्यन हे नाव सध्या चांगलंच चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये कार्तिकची सध्या चांगलीच चलती आहे. बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांचे चित्रपट फ्लॉप ठरत आहेत मात्र कार्तिक आर्यनचे एकामागोमाग एक चित्रपट हिट होत आहेत. आज कार्तिक त्याचा ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या वाढदिवसाचे निमित्तसाधून त्याने मुंबईतील प्रसिद्ध देवस्थान सिद्धिविनायक मंदिरात जाऊन त्याने बाप्पाचे दर्शन घेतले आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कार्तिक आर्यन यावेळी पांढऱ्या कुर्त्यामध्ये दिसला आहे. सिद्धिविनायक मंदिरात तो गेलयावर साहजिकच मंदिराबाहेर चाहत्यांची गर्दी जमली होती.

marathi actress smita shewale shares experience about yanda kartavya aahe movie
‘यंदा कर्तव्य आहे’ला १८ वर्षे पूर्ण! नवख्या स्मिता शेवाळेला कशी मिळाली होती भूमिका? तिनेच सांगितला अनुभव
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

वाढदिवसानिमित्त कार्तिक आर्यनकडून चाहत्यांना रिटर्न गिफ्ट; जबरदस्त अ‍ॅक्शन, दमदार संवाद असलेला Shehzada चा Teaser पाहाच

कार्तिक वाढदिवसापूर्वी आयएफएफआय (IFFI) 2022 च्या उद्घाटनात आपल्या बहारदार परफॉर्मन्सने उपस्थितांची मने जिंकली, कार्तिक आर्यांच्या चाहत्यांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी म्हणजे कार्तिकचा ‘शेहजादा’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या २०२० च्या ‘आला वैकुंठपुरमुल्लो’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे.

मोठ्या पडद्यावर कार्तिक ओटीटीवरदेखील आता येणार आहे. ‘धमाका’नंतर, त्याचा आगामी चित्रपट ‘फ्रेडी’ ओटिटी (OTT) वर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. आज अनेक चित्रपटात तो झळकत असला तरी त्याच्यासाठी हा संघर्ष सोपा नव्हता. कार्तिकने ऑडिशन आणि अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी कॉलेज सोडलं. त्यानंतर ३ वर्षे त्याला मॉडेलिंग करावं लागलं. कार्तिक आर्यनने पुढे क्रिएटिंग चरकटर्स इंस्टिट्यूटमधून अभिनयाचे धडे घेतले. अनेकवर्ष संघर्ष करत तो आज इथवर पोहचला आहे.