scorecardresearch

“प्रत्येक भारतीयाला त्यांचा अभिमान वाटायला पाहिजे, कारण…” बॉलिवूड अभिनेत्यानं केलं राहुल गांधींचं कौतुक

ल्या काही दिवसांपासून राहुल गांधी त्यांच्या परदेश दौऱ्यांमुळे सातत्याने चर्चेत आहेत.

rahul gandhi
(फोटो – इंडियन एक्सप्रेस)

काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते त्यांच्या परदेश दौऱ्यांमुळे सातत्याने चर्चेत आहेत. नुकत्याच एका भाषणात त्यांनी चीनचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारवर टीका केली होती. तसेच संसदेत चिनी सैनिकांच्या भारतात घुसखोरीचा मुद्दा विरोधकांना मांडू दिला जात नाही, असंही राहुल गांधी म्हणाले होते. त्याचबरोबर लंडनस्थित थिंक टँक चेथम हाऊसमध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली होती.

Video: “यांना पेंग्विनचा त्रास आहे अन्…” खांद्यावर पोपट ठेवून होळीच्या शुभेच्छा देणाऱ्या अमृता फडणवीस ट्रोल

यावेळी राहुल गांधी यांनी आरएसएसवरही जोरदार निशाणा साधला होता. राहुल यांनी काश्मीर, लोकशाही, परराष्ट्र धोरणापासून बीबीसीच्या माहितीपटावर बंदी आणि क्रोनी कॅपिटलिझमपर्यंतचे मुद्देही मांडले होते. राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. सोशल मीडियावर लोक त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता कमाल राशिद खान याने राहुल गांधींचे जोरदार कौतुक केले आहे. प्रत्येक भारतीयाला त्यांचा अभिमान वाटला पाहिजे, असं त्याने म्हटलं आहे.

“हे तुला शोभतं का?” विद्या बालनने न्यूड फोटोशूट आता केलंय? जाणून घ्या ‘त्या’ व्हायरल फोटोमागचं सत्य

“राहुल गांधींच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि काय म्हणता, ही तुमची मर्जी आहे. पण इंग्लंडमध्ये राहणाऱ्या कोणत्याही भारतीयाला राहुलच्या केंब्रिज, ऑक्सफर्ड आणि ब्रिटीश संसदेत झालेल्या व्याख्यानाबद्दल विचारा. ब्रिटनमध्ये एवढा मोठा सन्मान मिळालेल्या राहुल गांधींचा मला अभिमान आहे, असंच तिथले भारतीय म्हणतील,” असं केआरकेने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

केआरकेने त्याच्या दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले की, “एक भारतीय म्हणून मला किमान राहुल एक राजकारणी असल्याचा अभिमान आहे. जे भारतात, केंब्रिज आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटिश संसदेत व्याख्यानही देऊ शकतात. प्रत्येक भारतीयाला त्यांचा अभिमान वाटायला पाहिजे, याचा राजकारणाशी संबंध जोडू नये.” दरम्यान, केआरकेच्या या ट्वीटवर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी केआरकेचं समर्थन केलंय, तर काहींनी मात्र राहुल गांधीवर टीका करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-03-2023 at 10:34 IST