नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या 'जोगिरा सारा रा रा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट म्हणावी तशी कमाई करु शकलेला नाही. नुकतचं नवाजने बिग बजेट चित्रपटांबाबत वक्तव्य केल होतं. माझ्यासारख्या कलाकाराला घेऊन कोणीही अद्याप बिग बजेट चित्रपट केला नसल्याची खंत नवाजुद्दीने व्यक्त केली होती. नवाजुद्दीनच्या या वक्तव्यावर आता प्रसिद्ध अभिनेता कमाल रशिद खान याने टीका केली आहे. केआरकेने ट्वीट करत नवाजुद्दीनला सल्ला दिला आहे. हेही वाचा- “माझी बायको नेहमीच…”; लग्नाच्या ८ वर्षानंतर शाहिद कपूरचे मीरा राजपूतबाबत मोठं वक्तव्य, म्हणाला… कमाल रशीद खानने ट्वीट केले की, 'नवाजुद्दीनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, त्याला सोलो हिरो म्हणून कोणीही बिग बजेट चित्रपट ऑफर केलेला नाही. प्रिय नवाजुद्दीन, आरशात तुमचा चेहरा बघा आणि तुम्हाला समजेल की कोणी तुम्हाला छोटी भूमिका ऑफर करत असली तरी ती खूप मोठी गोष्ट आहे, कारण तू विचित्र दिसतोस.'' केआरकेचे हे ट्वीट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 'गँग्स ऑफ वासेपूर'ने नवाजुद्दीन सिद्दीकीचे नशीब पालटले. त्यानंतर नवाजने पुन्हा मागे वळून पाहिले नाही. यावर्षी नवाजुद्दीनच्या हातात जवळपास ८ चित्रपट आहेत, ज्यात 'हुड्डी', 'संधव', 'अदभूत', 'टिकू वेड्स शेरू', 'नूरानी चेहरा', 'बोले चुडिया' आणि 'संगीन' यांचा समावेश आहे. त्याचा 'जोगिरा सारा रा रा' नुकताच प्रदर्शित झाला आहे.