बॉलीवूडचे अनेक कलाकार २०२५ या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी परदेशात गेले होते. अभिषेक बच्चनपासून ते हृतिक रोशनसह अशा बऱ्याच कलाकारांनी परदेशात नव्या वर्षाचं स्वागत केलं. शनिवारी, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन लेक आराध्यासह मुंबईत परतले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता कपूर कुटुंबदेखील नवीन वर्ष साजरं करून मुंबईत परतलं आहे. याचे फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत.

२०२५ हे नवीन वर्ष साजरं करण्यासाठी कपूर कुटुंब थायलंडला गेलं होतं. यावेळी आलिया भट्टची बहीण शाहीन भट्ट आणि आई सोनी राजदानदेखील होत्या. फटक्यांच्या आतिषबाजीने आनंदात कपूर कुटुंबाने नवीन वर्षाचं स्वागत केलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. यामध्ये नवीन वर्ष सुरू होताच रणबीर कपूर धावत-धावत आलियाला घट्ट मिठी मारताना दिसला.

Arvind Kejriwal Old Video
Arvind Kejriwal Old Video : “मोदीजी या जन्मात तरी दिल्लीत…”, अरविंद केजरीवालांचा भाजपाला आव्हान देणारा जुना Video Viral
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Paaru
Video: लग्नातून गायब झालेला हरीश मालिकेत पुन्हा परतणार; पारूचे सत्य सर्वांसमोर येणार का?
nita ambani at Priyanka Chopra Brother Wedding Video out
Video: हातात पूजेची थाळी अन्…, मेहुण्याच्या लग्नातील निक जोनासचा व्हिडीओ चर्चेत; नीता अंबानींसह पाहुण्यांची मांदियाळी
Anusha Dandekar at Priyanka Chopra brother Siddharth sangeet watch video
Video: प्रियांका चोप्राच्या भावाच्या संगीत सोहळ्याला मराठी अभिनेत्रीची हजेरी, ग्लॅमरस लूकची होतेय चर्चा
Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!
video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे
Viral Girl Monalisa in Kumbhmela
Monalisa : व्हायरल गर्ल मोनालिसाला मिळाला हिंदी चित्रपट, ‘या’ दिग्दर्शकाने घरी जाऊन घेतली भेट

हेही वाचा – अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ची बॉक्स ऑफिसवर अजूनही जोरदार घोडदौड सुरुच; वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’ने शनिवारी केली ‘इतकी’ कमाई

त्यानंतर आता कपूर कुटुंब मुंबईत परतलं आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि राहाचा मुंबईत विमानतळावरील व्हिडीओ समोर आला आह. सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘मानव मंगलानी’च्या इन्स्टाग्राम पेजवर रणबीर, आलिया आणि राहाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये आलिया पुढे चालताना दिसत असून रणबीर राहाला कडेवर घेऊन गाडीत बसताना दिसत आहे.

हेही वाचा – Video: ऐश्वर्या-अविनाश नारकरांचा सुशांत सिंह राजपूत आणि अनुष्का शर्माच्या ‘या’ गाण्यावर रोमँटिक डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

दरम्यान, रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्याच्या ‘रामायण’ चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. या चित्रपटात रणबीर अभिनेत्री साई पल्लवीबरोबर झळकणार आहे. बिग बजेट असलेल्या ‘रामायण’ चित्रपटात बरेच तगडे कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत. याशिवाय ‘अ‍ॅनिमल पार्क’ आणि संजय लीला भन्साळीच्या ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटात रणबीर पाहायला मिळणार आहे. ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटात रणबीरसह आलिया भट्ट आणि विकी कौशल असणार आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: “फक्त लूक आणि आवाजावर…”, सलमान खान-काम्या पंजाबीने विवियन डिसेनाची केली कानउघडणी, काय म्हणाले? जाणून घ्या…

तसंच आलिया भट्ट सध्या यशराज फिल्म स्पाय युनिव्हर्सच्या ‘अल्फा’ चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा शिव रवैलवर आहे. ‘अल्फा’ चित्रपटात आलियाबरोबर अभिनेत्री शर्वरी वाघ झळकणार आहे.

Story img Loader