नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटामुळे अभिनेता रणबीर कपूर सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटात रणबीर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत झळकणार आहे. तर अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. नुकताच ‘रामायण’ चित्रपटाच्या सेटवरील दोघांचा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये रणबीर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत तर साई सीतेच्या भूमिकेत पाहायला मिळाले होते. अशातच रणबीरचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतं आहे; ज्यामध्ये रणबीर भडकल्याचं दिसत आहे.

‘रामायण’ चित्रपटाच्या चित्रीकरणातून ब्रेक घेऊन रणबीर काल, शनिवारी एका कार्यक्रमात उपस्थित राहिला होता. गुजरातच्या सूरत येथे एका दागिण्यांच्या दुकानाचं उद्घाटन करण्यासाठी रणबीर पोहोचला होता. यावेळी पापाराझीची एक कृती पाहून अभिनेता नाराज झाला.

Anant Ambani Lavish Wedding
“अंबानींच्या लग्नावर टीका करणारे तुम्ही कोण?” पाकिस्तानींना त्यांच्याच अभिनेत्याने सुनावलं; म्हणाला, “त्यांच्या पैशांवर…”
Poet Narayan Surve
नारायण सुर्वे यांच्या घरी चोराने मारला डल्ला, नंतर चिठ्ठी लिहून परत केली वस्तू; म्हणाला, “मला माहीत नव्हतं..”
gautam gambhir hugs shahrukh khan
Anant Radhika Wedding: गौतम गंभीर-किंग खानचा अंबानींच्या लग्नात ‘ब्रोमान्स’, एकमेकांना पाहताच… VIDEO व्हायरल
Elephant Viral Video
जंगलात कार पाहताच हत्ती भडकला, रागात हल्ला करण्यासाठी गजराज पुढे येताच लोकांच्या किंकाळ्या अन् पुढे घडलं असं की…
Anant Ambani Radhika Murchant Varun Grovar
“राजेशाही अराजकता निर्माण करते”, अनंत अंबानींच्या लग्नावरून लेखक वरूण ग्रोव्हर यांची जळजळीत टीका
Neelam Gorhe Ambadas Danve
दिलगिरीनंतर उपसभापती नीलम गोऱ्हे अंबादास दानवेंचं निलंबन मागे घेणार? म्हणाले, “सभागृहाचं पावित्र्य राखण्यासाठी…”
Sanskrit Oath Bansuri Swaraj
“जशी आई, तशी लेक”, बांसुरी स्वराज यांनी संस्कृतमधून शपथ घेताच नेटिझन्सकडून सुषमा स्वराज यांचा जुना व्हिडीओ व्हायरल
nana patekar talks about wife neelkanti patekar
“तिचे खूप उपकार, तिच्यामुळेच करिअर करू शकलो”; नाना पाटेकर यांचं पत्नीबद्दल वक्तव्य, वेगळं राहण्याबाबत म्हणाले…

हेही वाचा- अविनाश नारकरांची ‘ही’ लोकप्रिय मालिका होणार बंद, गेले अडीच वर्ष प्रेक्षकांचं करत होती मनोरंजन

रणबीरचा हा व्हिडीओ ‘इंस्टंट बॉलीवूड’ इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, रणबीर निवेदन करणाऱ्या महिलेशी बोलतो आणि निघतो. तितक्यात एक पापाराझी शिवी देतो. पापाराझीची ही शिवी ऐकून रणबीर भडकतो आणि म्हणतो, “ऐ हे काय होतंय?”

अभिनेत्याचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी देखील संतापले आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “ही कोणत्या पद्धतीची भाषा आहे. रणबीरलाही ऐकून धक्का बसला.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “नशीब रणबीरच्या जागी सलमान खान नव्हता.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “पापाराझी दिवसेंदिवस वाईट होतं चालले आहेत. त्यांना आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल शिक्षा व्हायला हवी.” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं, “ही वेळ आहे. पापाराझींसाठी कठोर नियम हवेत. कॅमेरा हातात आला की पापाराझी होता येत नाही. एक शिस्त पाहिजे.”

हेही वाचा – Video: “किती छान! उर भरून आला”, प्रथमेश लघाटे-मुग्धा वैशंपायन यांची मैफल ऐकून सुकन्या मोनेंची प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, रणबीरच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ‘रामायण’ चित्रपटाच्या व्यतिरिक्त अभिनेता संदीप रेड्डी वांगाच्या ‘अ‍ॅनिमल’चा सीक्वल ‘अ‍ॅनिमल’ पार्कमध्ये झळकणार आहे. या चित्रपटात रणबीर दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. अबरारचा छोटा भाऊ अजीज आणि रणविजयच्या भूमिकेत अभिनेता पाहायला मिळणार आहे.