‘या’ एका भीतीमुळे रणबीर कपूरने नाकारलेला हॉलिवूड चित्रपट; अभिनेत्याने स्वत: केला खुलासा

रणबीरला वंडर वुमन, स्टार वॉर्स सारख्या हॉलिवूडच्या चित्रपटांची ऑफर आली होती मात्र, त्याने ती नाकारली

ranbeer kapoor
रणबीरला वाटते हॉलिवूड चित्रपटात काम करण्याची भीती (संग्रहित छायाचित्र)

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट तू झुठी मैं मकरने चित्रपटगृहांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. रणबीर पहिल्यांदाच अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत दिसला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. रणबीर हा बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहे. आपल्या अभिनयाने त्यांनी लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. रणबीरने आपल्या चित्रपट कारकिर्दीत आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट आणि हिट चित्रपट दिले आहेत. मात्र, रणबीरला अजूनही एका गोष्टीची सगळ्यात जास्त भीती वाटते. खुद्द रणबीरने याबाबत खुलासा केला आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

हेही वाचा- अभिनेत्री पूजा भट्टला करोनाची लागण; ट्वीट करून दिली माहिती, म्हणाली, “तीन वर्षांनी…”

रणबीरला हॉलिवूड चित्रपटात काम करायची खूप भीती वाटते. रणबीरने स्वत: याबाबत माहिती दिली आहे. त्याला हॉलिवूडच्या ब्लॉकबस्टर चित्रपटात काम करण्याची ऑफर आली होती मात्र, त्याने भीतीपोटी ही ऑफर नाकारली. रणबीरला वंडर वुमन चित्रपटाचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पॅटी जेनकिन्स यांना स्टार वॉर्ससाठी ऑफर करण्यात आली होती. या चित्रपटात त्याला दुसरी मुख्य भूमिका ऑफर करण्यात आली होती. परंतु त्याने त्यातही काम करण्यास नकार दिला. या चित्रपटाच्या इतिहासाबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा- “पैशांसाठी भारतीय नागरिकत्व घेतलं” म्हणणाऱ्या पाकिस्तानींना अदनान सामीने सुनावलं; म्हणाला, “तिथे मी एका अत्यंत…”

रणबीर ऑडिशनच्या परफॉर्मन्सला घाबरतो

या नकारामागे रणबीरने कारण सांगितले आहे. एका मुलाखतीदरम्यान त्याने सांगितले की, तो ऑडिशन देताना खूप घाबरतो. तो म्हणाला की हॉलिवूडमधील त्याच्या ऑडिशन कामगिरीमुळे तो घाबरला होता, म्हणूनच त्याने स्टार वॉर्सची ऑफर नाकारली.

हेही वाचा- क्रिकेटपटूशी मैत्री, अफेअर अन्…; दुसऱ्याच व्यक्तीच्या प्रेमात वेडी होती माधुरी दीक्षित, तरीही श्रीराम नेने यांच्याशी का केलं लग्न?

रणबीरने सहा महिन्यांचा घेतला आहे ब्रेक

रणबीर सध्या सहा महिन्यांच्या ब्रेकवर आहे. त्याने अभिनयातून ब्रेक घेतला असून तो आपली मुलगी राहासोबत वेळ घालवत आहे. सहा महिन्यांनंतर तो ॲनिमल या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. रणबीरच्या हातात सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 16:41 IST
Next Story
अभिनेत्री पूजा भट्टला करोनाची लागण; ट्वीट करून दिली माहिती, म्हणाली, “तीन वर्षांनी…”
Exit mobile version