scorecardresearch

“तुझे मनापासून आभार…”, बॉडी डबलच्या निधनानंतर सलमान खानने शेअर केली भावूक पोस्ट

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या बॉडी डबल असलेल्या सागर पांडेचं ३० सप्टेंबरला निधन झालं.

“तुझे मनापासून आभार…”, बॉडी डबलच्या निधनानंतर सलमान खानने शेअर केली भावूक पोस्ट
सलमान खानने सागर पांडेच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा बॉडी डबल असलेल्या सागर पांडेचं ३० सप्टेंबरला निधन झालं. जिममध्ये वर्कआऊट करत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. तो ५० वर्षांचा होता. सलमान खानने सागरच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

सलमान खानने बॉडी डबल असलेल्या सागर पांडेबरोबरचा फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करत पोस्ट लिहली आहे. “तू कायम माझ्याबरोबर होतास, यासाठी तुझे मनापासून आभार मानत आहे. तुझ्या आत्म्याला शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना”, असं सलमानने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा >> “’बिग बॉस’च्या घरात जायला…”, महेश मांजरेकरांनी केलेल्या वक्तव्यावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया

हेही वाचा >> “नाटकाचा प्रयोग सुरू असताना लघुशंका आली अन्…”, प्रिया बापटने सांगितला ‘तो’ किस्सा

जिममध्ये वर्कआऊट करत असताना सागरच्या छातीत अचानक वेदना जाणवू लागल्या. त्यानंतर तो बेशुद्ध झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला जोगेश्वरीमधील बाळासाहेब ट्रॉमा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हेही पाहा >> Photos : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवालीचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते अवाक, कमेंट करत म्हणाले “बॉलिवूडमध्ये एन्ट्री…”

सागर पांडे सलमान खानची कार्बन कॉपी म्हणून ओळखला जायचा. १९९८ मध्ये ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातून बॉडी डबल म्हणून सागरने त्याच्या करिअरला सुरुवात केली. ‘दबंग’, ‘दबंग २’, ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘ट्यूबलाइट’ यांसारख्या जवळपास ५० चित्रपटात त्याने बॉडी डबल म्हणून काम केले आहे.

हेही वाचा >> Video : ‘ब्रह्मास्र’मधील ‘केसरिया’ गाणं पुन्हा होणार प्रदर्शित, अयान मुखर्जीने शेअर केला खास व्हिडीओ

सागर पांडे हा मुळचा उत्तर प्रदेशतील रहिवासी होता. अभिनेता बनण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आला होता. अनेक वर्षे संघर्ष करुनही त्याला सिनेसृष्टीत काम मिळाले नाही. त्यानंतर त्याने बॉडी डबल म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तो सलमान खानचा फार मोठा चाहता होता. त्याच्या निधनावर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या