बॉलीवूड अभिनेता संजय दत्त मध्य प्रदेशच्या छतरपूर येथे असलेल्या बागेश्वर धामला पोहोचला होता. काल, १५ जूनला संध्याकाळी संजय दत्तने आपल्या टीमसह बागेश्वर धामच्या बालाजी महाराजांचं दर्शन घेतलं. तसंच पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. याचा व्हिडीओ बागेश्वर धामच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

माहितीनुसार, काल १५ जूनला दुपारी चार वाजता संजय दत्त मुंबईहून बागेश्वर धामसाठी रवाना झाला होता. संध्याकाळी ६ वाजता तो खजुराहो विमानतळावर पोहोचला. यावेळी धाम परिवाराने अभिनेत्याचं जोरदार स्वागत केलं. त्यानंतर बागेश्वर धामला रवाना होऊन संजय दत्त सर्वात आधी बालाजी महाराजांसमोर नतमस्तक झाला. मग प्रदक्षिणा घातली आणि आशीर्वाद घेतले. यावेळी अभिनेत्याबरोबर धीरेंद्र शास्त्री होते. यांचे देखील संजय दत्त आशीर्वाद घेतले.

हेही वाचा – संथ सुरुवात झालेल्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशीच्या कमाईत चांगली वाढ, कमावले ‘इतके’ कोटी

‘आज तक’ वृत्तसंस्थेशी संवाद साधताना संजय दत्त म्हणाला, “देशातील आणि जगभरातील लोकांसाठी हे एक मोठं श्रद्धेचं केंद्र आहे. इथल्या भाविकांची श्रद्धा पाहून मी भारावून गेलो. महाराजांना भेटून असं वाटलं की, मी बऱ्याच वर्षांपासून त्यांना ओळखतो. त्यांच्यासह घालवलेला वेळ हा माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात चांगल्या क्षणांपैकी एक आहे. मी पुन्हा पुन्हा बागेश्वर धामला येईन. हे अद्भुत ठिकाण आहे. बालाजी सरकार आणि अद्भुत कृपा या ठिकाणी कायम आहे.”

हेही वाचा – ऐश्वर्या-अविनाश नारकरांच्या मुलाच्या गर्लफ्रेंडला पाहिलंत का? ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार

दरम्यान, संजय दत्तच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याचे अनेक चित्रपट प्रदर्शनाचा मार्गावर आहे. यात ‘वेलकम टू द जंगल’ नावाचा चित्रपट आहे. २०२४मधला बहुप्रतीक्षित असा हा चित्रपट आहे. तसंच संजयच्या ‘घुडचढी’ चित्रपटाची देखील घोषणा केली आहे. या चित्रपटात संजय दत्तसह अभिनेत्री रवीना टंडन आणि पार्थ समथान झळकणार आहे. याशिवाय संजय दत्तचा ‘मास्टर ब्लास्टर’ चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामध्ये टायगर श्रॉफसह संजय दत्त पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – Video: ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘सूसेकी’ गाण्यावर हृषिकेश-जानकीचा मराठमोळा ठसका, नेटकरी म्हणाले, “एकच नंबर…”

दुसऱ्या बाजूला महादेव बेटिंग ॲप प्रकरणात संजय दत्तचं नाव देखील सामील आहे. लवकरच ईडी संजय आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला समन्स बजावणार आहे. संजय दत्त आणि जॅकलीन व्यतिरिक्त प्रसिद्ध रॅपर बादशाहचं नावही या प्रकरणात आहे.