ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज पहाटे ५.२० च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. नाना पाटेकर यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतले अनेक कलाकार त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. अभिनेता शाहरुख खान यानेही एक इन्स्टाग्राम पोस्ट लिहून नाना पाटेकर यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
काय म्हटलंय शाहरुख खानने?
मी जेव्हा नाना पाटेकरांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा काहीसा ऑकवर्ड होतो. मी माझ्या केसांमध्ये हात फिरवत होतो. तेव्हा नाना माझ्याजवळ आले आणि म्हणाले हिरोसारखा केसांत हात फिरवू नकोस, तू अॅक्टर आहे. त्याने माझं कौतुक केलं नाही, त्याने मला जे ऐकायचं आहे ते म्हटलं नाही. कारण ती व्यक्ती नाना पाटेकर होती. नाना पाटेकर म्हणजे रांगडा, स्पष्टवक्ता आणि प्रामाणिक माणूस. शिवाय मला नाना पाटेकर यांचं हसणं हे फारच लाघवी वाटलं.
नाना पाटेकरांची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी होती-शाहरुख खान
नाना पाटेकर यांची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत अगदीच जगावेगळी होती. ते कधी ओरडायचे, तुम्हाला वाटायचं की अपमान तर करत नाहीत. पण तिसऱ्या किंवा चौथ्या वाक्याला त्यांनी तुम्हाला मिठी मारलेली असे. नाना पाटेकर यांचं माझ्यावर प्रेम होतं, मलाही ते आवडायचे, कलाकार म्हणून मीही त्यांच्यावर प्रेम करायचो. नाना पाटेकर म्हणजे माझ्यासाठी शिक्षक, टीकाकार आणि मित्र होता. तसंच मला मार्गदर्शन म्हणून त्यांनी कायमच मला सहकार्य केलं. आम्ही एकत्र कॅरम खेळायचो, मला आणि इतरांना हरवलं की नाना खुश असयाचे.
नाना तुमचा सल्ला मी कधीही विसरणार नाही-शाहरुख
नाना तुमचा जोश, तुमचा आनंद, तुमचं हसणं आणि काहीसा वेडेपणा यात एक धमाल होती ते सगळं आणि तुमचं प्रेम हे कायमच आमच्या सगळ्यांसह राहिल. एकच गोष्ट मागतो, पुन्हा आपण कॅरम खेळू, चहा पिऊ आणि खूप साऱ्या गप्पा मारू. वाद घालत बसू. नाना तुम्ही फक्त सिनेमाच्या जगात नाही सगळ्या भारतीयांच्या मनात एक रिकामी जागा सोडून गेला आहात. मी आज हेच सांगतो की तुमचे शब्द मी माझ्या मनात कायमच साठवून ठेवेन. तुम्ही म्हणाला होतात हिरो बनण्याच्या तयारीत अभिनेता आहेस हे विसरू नकोस. तुमचा हा सल्ला खूप मोलाचा होता मी तो कायमच जपला आहे. अल्लाह तुम्हाला शांती देओ, एक अप्रतिम अभिनेता आणि कॅरम चॅम्पियन गमावला आहे, तुमची खूप खूप आठवण येईल नाना. RIP अशी पोस्ट शाहरुख खानने लिहिली आहे. तसंच राजू बन गया जंटलमन या चित्रपटातील एक खास फोटोही शेअर केला आहे.
