scorecardresearch

सोशल मीडियावर व्हायरल होणारा शाहरुख खानचा फोटो कोणत्या चित्रपटातला आहे? ओळखा पाहू

शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सक्रीय झाल्याचं दिसून येतं

kabhi ha kabhi na srk
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान मागच्या काही दिवसांपासून बराच चर्चेत आहे. त्याचा ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला. जगभरात या चित्रपटाने चांगलाच गल्ला जमवला. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे विक्रम मोडीत काढले आहेत. शाहरुख खान अभिनयाच्याबरोबरीने सोशल मीडियावर सक्रीय असतो. नुकताच त्याने ट्वीटर अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यावरून त्याचे चाहते कमेंट करत आहेत.

शाहरुख खान ट्वीटवर ask me हे सेशन घेत असतो. नुकताच त्याने आपल्याच चित्रपटातला फोटो शेअर केला आहे. हा फोटो त्याच्या ‘कभी हा कभी ना’ चित्रपटातला आहे. या फोटोला त्याने कॅप्शन दिला आहे, “त्या वयात, अनियंत्रित, थोडा कच्चा, क्राफ्ट न ठरलेला… भारतातील सर्वोत्कृष्ट कलाकार, टीम आणि त्याचा दिग्दर्शक ज्याची मला रोज आठवण येते. त्याने मला शिकवले कधीतरी तू क्षण मिस करशील मात्र कधीतरी नक्कीच जिंकशील, मला खात्री आहे की कुठेतरी सुनीलने जग निर्माण केले आहे.” असा कॅप्शन त्याने दिला आहे.

Video : “गरोदर आहेस का?” स्टायलिस्ट साडीत हुमा कुरेशीचा बोल्ड अंदाज; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

शाहरुखचा ‘कभी हा कभी ना’ चित्रपट लक्षवेधी ठरला होता. या चित्रपटात त्याने सुनील नावाचे पात्र साकारले होते. शाहरुख व्यतिरिक्त या चित्रपटात आशुतोष गोवारीकर. दीपक तिजोरी, नसरुद्दिन शाह,सतीश शाह असे दिग्गज कलाकार यात होते. चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. १९९४ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

दरम्यान ‘पठाण’ हिंदीसह तमिळ, तेलुगू भाषेमध्येही प्रदर्शित करण्यात आला. आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात १००० कोटींची कमाई केली आहे . पठाणच्या यशानंतर शाहरुख आता डंकी व जवान या चित्रपटात झळकणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-02-2023 at 17:26 IST
ताज्या बातम्या