बॉलिवूडमधील लोकप्रिय ऑनस्क्रीन जोडपं कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा अखेर विवाह बंधनात अडकणार आहेत. गेले अनेक महिने ते रिलेशनशिप मध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांच्या लग्नामुळे त्यांचे चाहते खूप उत्सुक झाले आहेत. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. त्याच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती बॉलिवूडशी संलग्न नव्हती. मात्र त्याने स्वबळावर बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण केले आहे.
सिद्धार्थ मल्होत्राने ‘स्टुडन्ट ऑफ द ईयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. या चित्रपटात त्याच्याबरोअबर दोन स्टार किड्स होते ते म्हणजे आलिया भट्ट आणि वरुण धवन मत त्याने आपली छाप सोडली. अभिनयाच्या आधी त्याने मॉडेलिंग सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनदेखील काम केले आहे. मात्र त्याला हे काम करायचे नव्हते. इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्याने खुलासा केला होता.
तो असं म्हणाला, “मी मुंबईत आलो तेव्हा मला एक चित्रपट मिळाला होता मला वाटले मी ते इतक्या लहान खूप काही कमावले आहे परंतु तो चित्रपट आला नाही. मग मी पुन्हा मुंबईत काम शोधू लागलो. मॉडेलिंग करून मी मला माझा पॉकेटमनी कमवता येईल असे वाटले होते मात्र ही योजना काही काळ चालली. त्यानंतर मुंबईत राहण्यासाठी संघर्ष करत होतो. मला कधीच सहाय्यक दिग्दर्शक कधीच व्हायचे नव्हते पण मी झालो. आयुष्याने मला खूप काही शिकवले” आपली प्रतिक्रिया दिली.
दिग्दर्शक करण जोहरच्या ‘माय नेम इज खान चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. तसेच त्याने दोस्ताना चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शनाचे काम केले आहे. ‘स्टुडन्ट ऑफ द ईअर’ चित्रपटापासून तो आता नायक म्हणून काम करत आहे. ‘एक व्हिलन’, ‘बार बार देखो’, ‘कपूर अँड सन्स’, ‘हसी तो फसी’ यासारख्या सुपरहिट चित्रपटात त्याने काम केले आहे.