बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान इतरांच्या मदतीसाठी कायम तत्पर असतो. बॉलिवूडमध्ये त्याचा मोठा मित्रपरिवार आहे. सलमानच्याबरोबरीने आता त्याचा भाऊ सोहेल खानचं सध्या कौतुक होत आहे. एका जखमी महिलेला त्याने मदत केली आहे. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून त्याचे कौतुक होत आहे.
सोहेल खान अनेकदा मुंबईत इतर सामान्य माणसांप्रमाणे वावरताना दिसतो. अशातच शुक्रवारी एक महिला जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले त्याने पहिले, ती महिला वेदनेने धाय मोकलून रडत होती. त्याने लगेच पुढे येऊन महिलेला मदत केली आहे. सोशल मीडियावर लोक त्याचे कौतुक करत आहेत. लोक म्हणतात की ‘तो उदार आहे’ आणि ‘जर तो स्टार असता तर कदाचित त्याने हे केले नसते.’
नेटकऱ्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे, एकाने लिहले आहे “सोहेल खूप दयाळू आहे.” आणखी एकाने लिहले आहे “त्याच्याकडे सोन्याचे हृदय आहे.” एकाने त्याला ‘सज्जन गृहस्थ’ असे संबोधले आहे.
सोहेल एक उत्तम अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. त्याने अनेक चित्रपटात काम केले आहे तसेच हॅलो ब्रदर, जय हो यासांरख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सोहेल खानने सीमा सजदेह बरोबर १९९८ मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांना निर्वाण आणि योहान ही दोन मुले आहेत.