scorecardresearch

“प्रेक्षक बदली अभिनेता…” ‘हेरा फेरी ३’ मधील अक्षयच्या रिप्लेसमेंटवरून सुनील शेट्टीचे स्पष्टीकरण; कार्तिक आर्यनचा ही केला उल्लेख

‘हेरा फेरी ३’ मध्ये अक्षय कुमार नसणार यावरून अनेक चर्चा रंगल्या होत्या

sunil shety 4
फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक टीम

अक्षय कुमार, परेश रावल, सुनील शेट्टी या त्रिकुटाचा २००० साली ‘हेराफेरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा चाहता वर्ग मोठा आहे. आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरवात झाली असून नुकताच सेटवरील एक फोटो व्हायरल झाला आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन दिसणार अशी चर्चा होती मात्र अभिनेता यात दिसणार नाही. सुनील शेट्टीने आता यावर भाष्य केलं आहे.

मध्यंतरी या चित्रपटाबद्दल मोठा वाद निर्माण झाला होता. या चित्रपटाला अक्षय कुमारने नकार दिल्यामुळे त्याची जागा कार्तिक आर्यन घेणार असल्याचं समोर आलं होतं. पण काही दिवसांनी निर्माते आणि अक्षय कुमार यांच्यामधील वाद मिटला आहे. अभिनेता सुनील शेट्टीने इटाईम्सशी बोलताना असं म्हणाला, “मी नेहमीच म्हणत आलो आहे कार्तिक आर्यन हा नवीन मुलगा आहे जो असामान्य आहे, पण तो अक्षय कुमारची जागा घेऊ शकत नाही. राजू नेहमी राजूच राहील आणि प्रेक्षक बदली अभिनेता स्वीकारणार नाहीत.”

Oscar Awards 2023 : दीपिकाच्या ग्लॅमरस लूकची जोरदार चर्चा; आलिया भट्ट कमेंट करत म्हणाली…

तो पुढे म्हणाला, “निर्माता आणि त्याच्यामध्ये जे काही घडले, ते अक्कीला माहीत आहे, पण यापूर्वी जेव्हा मी अक्कीशी बोललो होतो, तेव्हा मी त्याला नेहमी सांगितले होते की हा चित्रपट आमचे पहिले प्राध्यान असेल.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

आता अभिनेता संजय दत्तदेखील यात खलनायकाची भूमिका करताना दिसणार आहे. मूळ ‘हेरा फेरी’ हा चित्रपट २००० मध्ये प्रदर्शित झाला होता. २००६ मध्ये या फ्रेन्चायझीचा दुसरा चित्रपट ‘हेरा फेरी २’ प्रदर्शित झाला. आता प्रेक्षक ‘हेरा फेरी ३’ची आतुरतेने वाट बघत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-03-2023 at 16:42 IST