Sunny Deol Education : धर्मेंद्र व प्रकाश कौर यांचा थोरला मुलगा सनी देओल बॉलीवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. चार भावंडांपैकी सनी व बॉबी दोघेही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत फिल्म इंडस्ट्रीत आले, तर त्यांच्या दोन्ही बहिणी या ग्लॅमरविश्वापासून खूप दूर आहेत. १९ ऑक्टोबर १९५७ रोजी जन्मलेल्या सनीने आतापर्यंत १०० पेक्षा जास्त बॉलीवूड चित्रपट केले आहेत. अॅक्शन हिरो अशी ओळख असलेला सनी देओल किती शिकला आहे? त्याने शिक्षण कुठून पूर्ण केलं? ते जाणून घेऊयात.

सनी देओलचं खरं नाव अजय सिंह देओल आहे. त्याचा जन्म पंजाबमधील साहनेवाल गावात झाला, पण त्याचं बालपण मुंबईत गेलं. सनीने त्याचे शालेय शिक्षण मुंबईतील सेक्रेड हार्ट बॉईज हायस्कूलमधून पूर्ण केले. शाळेत असतानाच सनीला चित्रपट आणि अभिनयात रस निर्माण झाला. त्याचे वडील धर्मेंद्र यांना पडद्यावर अभिनय करताना पाहून तो स्वतःही अभिनेता होण्याचे स्वप्न पाहू लागला.

सनीने मुंबईत पूर्ण केले ग्रॅज्युएशन

सनीने नंतर रामनिरंजन आनंदीलाल पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकोनॉमिक्समधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. या कॉलेजमधून इतरही अनेक सेलिब्रिटींनी शिक्षण घेतलं आहे. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यावर सनी करिअर करायच्या उद्देशाने थिएटर व अभिनयाकडे वळला. अभिनयाकडे फक्त आवड नाही तर करिअर म्हणून पाहतो, असं सनी एकदा म्हणाला होता.

सनी देओलने इंग्लंडमधील बर्मिंगहॅम स्कूल ऑफ स्पीकिंग अँड ड्रामा येथून अभिनयाचे धडे गिरवले. तसेच त्याने स्टेज परफॉर्मन्स व वक्तृत्व कौशल्य सुधारण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यानंतर सनीने काही काळ थिएटरमध्ये काम केलं. लाइव्ह परफॉर्मन्स केल्याने सनीचा आत्मविश्वास वाढला.

वडील धर्मेंद्र बॉलीवूडचे दिग्गज स्टार असल्याने सनीला इंडस्ट्रीत लोक ओळखत होते, पण त्याने वडिलांचं नाव वापरलं नाही. त्याने स्वतःचे कौशल्य व मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीत नाव कमावलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता सनी देओल फक्त एक यशस्वी अभिनेताच नाही तर एक दिग्दर्शक, निर्माता आणि राजकारणी देखील आहे. त्याने दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि दोन फिल्मफेअर पुरस्कार देखील जिंकले आहेत. २०१९ ते २०२४ पर्यंत तो पंजाबमधील गुरुदासपूर येथून भाजपाचा खासदार होता.