"ऑडिशनदरम्यान नकार मिळाल्यानंतर मी..." विकी कौशलचा करिअरबद्दल मोठा खुलासा | Bollywood actor Vicky Kaushal People were not ready to give me work nrp 97 | Loksatta

“ऑडिशनदरम्यान नकार मिळाल्यानंतर मी…” विकी कौशलचा करिअरबद्दल मोठा खुलासा

“मी माझी स्वप्न अशाप्रकारे हातातून निसटताना पाहू शकत नाही.”

“ऑडिशनदरम्यान नकार मिळाल्यानंतर मी…” विकी कौशलचा करिअरबद्दल मोठा खुलासा
विकी कौशल

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हा सिनेसृष्टीतील सर्वात उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. दमदार अभिनय आणि हटके भूमिकांसाठी विकीला खास ओळखले जाते. अगदी कमी कालावधी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणून ओळखले जाते. विकी कौशल हा सध्या ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतंच त्याने मराठीतील लोकप्रिय कॉमेडी शो ‘चला हवा येऊ द्या’मध्ये हजेरी लावली. यावेळी त्याने त्याच्या संघर्षमय दिवसांबद्दल भाष्य केले.

विकी कौशल हा लवकरच ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तो नेहमीपेक्षा वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकर आणि कियारा आडवाणी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत. विकी कौशल सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतीच त्याने चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने मराठीतील लोकप्रिय कॉमेडी शो ‘चला हवा येऊ द्या’मध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्याने अनेक आठवणींना उजाळा दिला.
आणखी वाचा : विकी कौशलने कतरिनाला डावलून दीपिका पदुकोणला दिलेली पहिली पसंती, पाहा व्हिडीओ

“मी जेव्हा सुरुवातीला सिनेसृष्टीत आलो, त्यावेळी मला काम देण्यास कोणीही उत्सुक नव्हते. कोणीही मला कास्ट करत नव्हते. अनेकांनी मला विविध कारण देऊन नाकारले. का, कशासाठी याबद्दल मला कल्पना नाही. एखादी ऑडिशन दिली आणि त्यात नकार मिळाला तर मी निराश व्हायचो. त्यानंतर घरी गेल्यानंतर आईसमोर बसायचो. मी माझी स्वप्न अशाप्रकारे हातातून निसटताना पाहू शकत नाही. पण हे माझ्याबरोबरच का आणि कशासाठी व्हायचे हे मला माहित नाही, असे मी आईला अनेकदा सांगायचो.

पण त्यावेळी मला माझ्या आईने फार मदत केली. त्यावेळी ती मला म्हणायची की, तू हा विचार करु नकोस की तुझ्याबरोबर हे सर्व का आणि कशासाठी होतंय, फक्त हा विचार कर की हे सर्व लवकरच ठिक होईल याचा विचार कर. तिचे हे शब्द ऐकल्यानंतर माझ्या चिंता दूर व्हायच्या. त्यानंतर मी सकारात्मक विचार करायचो”, असे त्याने सांगितले.

आणखी वाचा : मालवणी जेवण, ठेचा- बाकरवडी अन्… ‘चला हवा येऊ द्या’मध्ये विकी कौशलची थेट मराठीत डायलॉगबाजी

दरम्यान विकी कौशल मूळचा मुंबईकर असून त्याचे वडील श्याम कौशल हे चित्रपटांमध्ये साहसी दृश्य दिग्दर्शित करतात. विकी पेशाने इंजिनीअर असून त्याने आपल्या कारकिर्दीची सुरवात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली आहे. मसान चित्रपटातून त्याने अभिनय करण्यास सुरवात केली. पुढे त्याने ‘राझी’, ‘उरी’, ‘सरदार उधम’ यांसारख्या चित्रपटात त्याने काम केले आहे. नुकतंच त्याने अभिनेत्री कतरिना कैफबरोबर त्याने लग्नगाठ बांधली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 19:21 IST
Next Story
अक्षय, टायगरच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी; पोस्टर आले समोर