बॉलिवूड अभिनेते अभिनेत्रींचे फोटो सोशल मीडियावर कायमच व्हायरल होत असतात. मग ते चित्रपटाचे प्रमोशन असो किंवा एखाद्या पार्टीतले फोटो असो, त्यांच्या फोटोंवर नेटकरी कायमच कमेंट करत असतात. तसेच सध्या चित्रपटाच्या सेटवरचेदेखील फोटो शेअर करत असतात. या फोटोंवर त्यांचे चाहतेदेखील भरभरून कमेंट करत असतात. विकी कौशल ने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे.
बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता विकी कौशल कायमच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी त्याचा ‘गोविंदा नाम मेरा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता विकी कौशलने त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘सॅम बहादुर’. गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते. विकीने इन्स्टाग्रामवर माहिती दिली होती. त्याने कॅप्शनमध्ये म्हंटल आहे, “कृतज्ञता कृतज्ञता आणि फक्त कृतज्ञता एका खऱ्या महापुरुषाच्या जीवनाचे चित्रण करण्यासाठी या प्रक्रियेचा एक भाग होता आले . खूप काही मला जगायला मिळालं, खूप काही शिकायला मिळालं… खूप काही तुमच्या सगळ्यांसमोर आणायचं आहे. मेघना, रॉनी, माझे उत्कृष्ट कलाकार, अतुलनीय टीम, माणेकशॉ कुटुंब, भारतीय सैन्या आणि सॅम एच. एफ. जे. माणेकशॉ यांना धन्यवाद.”
सॅम माणेकशॉ यांच्या चरित्रपटामध्ये विकी कौशलसह सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख दिसणार आहेत. सान्या सॅम माणेकशॉ यांच्या पत्नीची, तर फातिमा पंतप्रधान इंदिरा गांधी यांची व्यक्तिरेखा साकारणार आहेत असे म्हटले जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करणार आहेत. विकीच्या ‘राझी’ चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनीच केले होते.
चाहतेही विकीच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची एक झलक त्याने शेअर केली होती. हा चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.