इंडस्ट्रीत लग्न किंवा इतर कारणांनी धर्मांतर करणारे बरेच कलाकार आहेत. पण आम्ही आज तुम्हाला एका बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीबद्दल सांगणार आहोत, जिने वाईन पिण्यासाठी धर्म बदलला. तिने धर्म बदलल्याचं आजपर्यंत तिच्या आई-वडिलांनाही माहीत नाही, असंही तिने सांगितलं आहे.
बॉलीवूड अभिनेता गोविंदाची (Govinda) पत्नी सुनीता आहुजा तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे. या मुलाखतीत तिने तिच्या धार्मिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीबद्दल खुलासा केला. तिचे आई-वडील पंजाबी आणि नेपाळी होते, पण ती शाळेत जायला लागल्यावर तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारला. चर्चमध्ये वाईन प्यायला दिली जाते आणि मला वाईनची चव चाखायची होती त्यामुळे ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचं सुनीताने सांगितलं.
Sunita Ahuja converted to Christianity: एका पॉडकास्टमध्ये सुनिता म्हणाली, “माझा जन्म वांद्रेमध्ये झाला. मी एका ख्रिश्चन शाळेत होते आणि माझे सर्व मित्र ख्रिश्चन होते. येशूचे रक्त म्हणजे वाईन आहे, असं मी लहानपणी ऐकलं होतं. मग मी विचार केला, ‘वाईन म्हणजे दारू’. मी खूप हुशार होते. दारू प्यायल्याने काही होत नाही, हो ना? मग मी वाईनसाठी ख्रिश्चन झाले. मी ख्रिश्चन धर्माचे पालन करते आणि मी दर शनिवारी चर्चमध्ये जाते.”
आई-वडिलांना माहीतच नाही
सुनीता म्हणाली की ती दर्गा, गुरुद्वारा आणि मंदिरातही जाते. ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याने तिचे आई-वडील तिच्यावर नाराज झाले होते का? असं विचारल्यावर सुनीताने सांगितलं की त्यांनी कधी कळालंच नाही. तसेच ती आठवडाभर वेगवेगळे उपवास करते आणि काही विशिष्ट दिवशी मांसाहार करणे टाळते, असंही ती म्हणाली.
सुनिताने तिच्या आणि गोविंदामधील सांस्कृतिक फरकांबद्दल खुलासा केला आणि म्हणाली, “मी मिनीस्कर्ट घालायचे पण लग्नानंतर साडी नेसू लागले. कारण माझ्या नवऱ्याला ते आवडायचं नाही. मी त्याला म्हणायचे ‘मी वांद्रेची आहे आणि तू विरारचा आहेस’ आणि यावर तो म्हणायचा, ‘माझ्या आईला आवडणार नाही’.”
तीन वर्षे डेटिंग केल्यानंतर सुनीता आणि गोविंदा यांनी १९८७ मध्ये लग्न केले. त्यांना मुलगी टीना आणि मुलगा यशवर्धन अशी दोन अपत्ये आहेत. टीनाने अभिनयात नशीब आजमावलंय, तर यशवर्धन त्याच्या पदार्पणाची तयारी करत आहे.