scorecardresearch

पुरस्कार सोहळ्यात भाषण देत होती आलिया भट्ट, बाळाने पोटात पाय मारला अन्…

आलियाला ‘टाइम्स १०० इम्पॅक्ट अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आलं.

पुरस्कार सोहळ्यात भाषण देत होती आलिया भट्ट, बाळाने पोटात पाय मारला अन्…
आलियाला ‘टाइम्स १०० इम्पॅक्ट अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आलं. (फोटो : आलिया भट्ट/ इन्स्टाग्राम)

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच आई होणार आहे. आलियाने अभिनयाच्या जादूने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. नुकतंच आलियाला ‘टाइम्स १०० इम्पॅक्ट अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आलं. सिंगापूरमध्ये आयोजन करण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्याला आलियाने हजेरी लावली.

आलियाने पुरस्कार सोहळ्यासाठी मेटालिक गाऊन परिधान करत खास लूक केला होता. पुरस्कार सोहळ्यादरम्यान आलिया बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसून आली. आलियाने मान्यवरांचे आभार मानत पुरस्काराबद्दल तिच्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, “दहा वर्षांपूर्वी मी अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. मला उत्तम अभिनेत्री व्हायचं होतं. मी किती हुशार, गुणवान आणि मेहनती आहे, हे एक दिवस सगळ्यांना कळेल, अशी माझी भावना असायची”.

हेही वाचा >> पंतप्रधान मोदींच्या भेटवस्तूंच्या लिलावात कंगना रणौतने ‘या’ दोन गोष्टींवर लावली बोली, अयोध्येतील राम मंदिराशी आहे खास कनेक्शन

हेही पाहा >> Photos : ‘आई कुठे काय करते’ मधील यशच्या बहिणीची ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री, जाणून घ्या तिच्याबद्दल

पुढे आलिया म्हणाली, “या पुरस्कार सोहळ्यात माझ्या देशाचं मी प्रतिनिधीत्व करत आहे, याचा मला अभिमान आहे. मला आणि माझं करिअर घडवण्यात या देशाचा फार मोठा वाटा आहे. माझ्याबरोबर या पुरस्काराने होणाऱ्या बाळावरही प्रभाव पाडला आहे. भाषण देत असताना माझ्या पोटात बाळ पाय मारत होतं”. आलियाच्या फॅन पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा >> “नाटकाचा प्रयोग सुरू असताना लघुशंका आली अन्…”, प्रिया बापटने सांगितला ‘तो’ किस्सा

आलिया भट्ट आणि बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेला ‘ब्रह्मास्र’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटात त्यांच्यासह बिग बी अमिताभ बच्चन, दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन, अभिनेत्री मौनी रॉय यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

हेही वाचा >> “’बिग बॉस’च्या घरात जायला…”, महेश मांजरेकरांनी केलेल्या वक्तव्यावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया

आलियाने बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरशी एप्रिल २०२२मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नानंतर काही महिन्यांतच आलिया-रणबीरने आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांनी दिली. संपूर्ण कपूर कुटुंबीय त्यांच्या घरी येणाऱ्या नव्या पाहुण्याच्या स्वागताची जय्यत तयारी करत आहेत. चाहतेही आलिया-रणबीरच्या बाळासाठी उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या