बॉलिवूड व दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री एमी जॅक्सन सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. नुकत्याच नव्या हेअर स्टाइलमुळे एमी चर्चेत आली. या तिच्या नव्या लुकवरून तिला प्रचंड ट्रॉलिंगचाही सामना करावा लागला. गेले काही दिवस एमीचा नवीन लुक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी एमीने तिचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले होते. तिच्या या नव्या लूकची नेटकऱ्यांनी चांगलीच खिल्ली उडवली. इतकंच नव्हे तर तिची तुलना ‘ओपनहायमर’ फेम हॉलीवूड अभिनेता सिलियन मर्फीशीही केली. सिलियनची अन् एमीची हेअर स्टाइल किती सारखी आहे अशी तुलना करून लोकांनी एमीला चांगलंच ट्रोल केलं.

Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Aai Kuthe Kay Karte
अरुंधतीचं पूर्ण नाव काय? प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीने दिलं एकदम करेक्ट उत्तर, पाहा व्हिडीओ
Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
video of a guy Heartwarming Answer
“बहिण का स्पेशल असते?” तरुणांनी दिले सुंदर उत्तर, प्रत्येक भावाने पाहावा हा VIDEO
Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”

आणखी वाचा : १००० कोटी कमावण्याबद्दल शाहरुखने केलेली १० वर्षांपूर्वीच भविष्यवाणी; किंग खानचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

सतत होणाऱ्या ट्रोलिंगला आणि या नकारात्मक कॉमेंटना एमीने नुकतंच उत्तर दिलं आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये एमी म्हणाली, “मी अभिनेत्री आहे अन् मी माझ्या कामाकडे अत्यंत गंभीरपणे पाहते. सध्या एका प्रोजेक्टवर काम करत असताना त्या व्यक्तिरेखेसाठी मला स्वतःला पूर्णपणे बदलावे लागले. भारतात ज्या पद्धतीने यावर ट्रोलिंग होत आहे ते पाहून वाईट वाटतं.”

पुढे ती म्हणाली, “बऱ्याच पुरुष कलाकारांनी याआधी असे लूक बदलले आहेत अन् लोकांनी त्यांचं कौतुकही केलं आहे. पण जेव्हा एखादी स्त्री असा एखादा लूक बदलते तेव्हा ते तिच्या सौंदर्यासाठी चांगले नाही असं बोलायचा लोकांना हक्क मिळतो.” एमीने अनेक बॉलिवूड चित्रपटात काम केलं आहे तसेच रजनीकांत यांच्या ‘२.०’मध्येही एमी झळकली होती.