बॉलिवूडची स्टार किड्सपैकी अनन्या पांडे आघाडची अभिनेत्री आहे. चित्रपटांपेक्षा तिच्या स्टाईल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. काही महिन्यांपासून बी-टाऊनमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरच्या अफेअरच्या बातम्या जोरात आहेत. अनन्याने आदित्य रॉय कपूरच्या ‘द नाईट मॅनेजर’ या वेब सीरिजच्या प्रीमियरलाही हजेरी लावली होती. आता त्या दोघांनी लॅक्मे फॅशन विकमध्ये एकत्र वॉक केल्याने या दोघांच्या नात्याची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.
लॅक्मे फॅशन विकच्या ग्रँड फिनालेमध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. या ग्रँड फिनालेमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरही दिसले. दोघेही मनिष मल्होत्राचे शो स्टॉपर होते. त्यांनी एकत्र वॉक केला आणि पोज दिल्या. दोघांचे फोटो व्हायरल झाले मात्र नेटकऱ्यांना ही जोडी आवडलेली दिसत नाही. त्यांच्या फोटोवर नेटकरी कमेंट करत आहेत.
अनन्या बऱ्याच ट्रोल होत असते. आदित्यबरोबरच्या फोटोंवर नेटकरी कमेंट करताना श्रद्धा कपूरचं आठवण काढत आहेत. एकाने लिहले आहे “आदित्य व श्रद्धा कपूर चांगले दिसतात” तर दुसऱ्याने लिहले आहे, “आदित्यला नक्कीच हिच्यापेक्षा चांगली मुलगी मिळेल” तर तिसऱ्याने लिहले आहे, “आदित्यचं मिळायचा बाकी होता का?” अशा प्रतिक्रिया येत आहेत.
आदित्य आणि अनन्या बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूडच्या अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र दिसत आहेत. सिद्धार्थ कियाराच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीशिवाय, हे दोघं क्रिती सेनॉनच्या दिवाळी पार्टीतही दिसले होते. अंगद बेदी आणि नेहा धुपियाने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या पार्टीचे काही फोटो शेअर केले होते.