बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. गेले काही महीने ती मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांना अपडेट देत असते. तिचा पती विराट कोहलीबरोबर नुकतीच ती दुबईला जाऊन आली आहे. अनुष्का सध्या वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. तिने चक्क विक्रीकर विभागाविरोधात याचिका दाखल केली आहे.

अनुष्का शर्माला विक्रीकर विभागाने २०१२ – १३ साली नोटीस बजावली होती. या नोटीसच्या विरोधात अनुष्काने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याआधी तिने तिच्या कर सल्लागारामार्फत याचिका दाखल केली होती. मात्र मुंबई हायकोर्टाने यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर तिने ती याचिका मागे घेऊन मागच्या आठवड्यात तिने नवी याचिका दाखल केली आहे. ANI च्या माहितीनुसार तिच्या हायकोर्टाने तिच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सहमती दर्शवली आहे.

Indian-American Congressman Shri Thanedar
“ही फक्त सुरुवात..”, अमेरिकेत हिंदूंवर हल्ले वाढल्यानंतर भारतीय वंशाच्या खासदाराने व्यक्त केली चिंता
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!
india chiana Meeting in Beijing on India China border dispute
भारत-चीन सीमावादावर बीजिंगमध्ये बैठक; परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्यावर सहमती
Kangana Ranut and surpiya
काँग्रेसच्या महिला नेत्याने पोस्ट केलेल्या कंगनाच्या ‘त्या’ फोटोवरून वादंग; अभिनेत्री म्हणाली, “वेश्याव्यवसाय करणाऱ्या…”

‘पठाण’साठी किती फी घेतलीस? चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख खान म्हणाला…

एक पुरस्कार सोहळ्यात निवेदन, सादरीकरण तसेच उत्पादनांची केलेली जाहिरातबाजी तसेच कॉपीराइट कायदयाचे उल्लंघन केले असा ठपका तिच्यावर लावण्यात आला होता. तसेच २०१२, १३ सालात तिने कर भरला नसल्याने थकबाकी वसूल करण्याची नोटीस तिला पाठवण्यात आली. तिने दाखल केलेल्या याचिकेवर विक्रीकर विभागाला तीन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश देत ६ फेब्रुवारी सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे.

अनुष्का सध्या ‘छकडा एक्सप्रेस’ या बायोपिकवर काम करत आहे. यामध्ये अनुष्का महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.