बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासूने काही महिन्यांपूर्वी गोंडस मुलीला जन्म दिला. बिपाशा व करण सिंग ग्रोवरला १२ नोव्हेंबरला कन्यारत्न झालं. त्यांनी आपल्या लेकीचे नाव 'देवी' असे ठेवले आहे. काही महिन्यांपूर्वी बिपाशाने तिच्या लेकीचे फोटो शेअर केले होते. हेही वाचा- “याने पुन्हा इडल्या विकाव्यात…” पहिल्या चित्रपटानंतर सुनील शेट्टीची प्रसिद्ध समीक्षकाने उडवलेली खिल्ली बिपाशा सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. अनेकदा ती आपल्या लाडक्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतीच बिपाशा आणि करणने आपल्या सहा महिन्यांच्या मुलीसाठी नवी कार खरेदी केली आहे. या कारची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे. बिपाशा बसूने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या नवीन कारचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती पती करण सिंग ग्रोवरबरोबर Audi Q7 ची डिलिव्हरी घेताना दिसत आहे. कार घेण्यापूर्वी या जोडप्याने केक कापून आनंद साजरा केला. या व्हिडीओमध्ये बिपाशाने पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या शर्टसोबत व्हाइट जीन्स घातली आहे. व्हिडीओमध्ये बिपाशा खूप आनंदी दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करीत बिपाशाने लिहिले की "देवीची नवीन सवारी. दुर्गा दुर्गा." बिपाशाच्या या व्हिडीओवर तिचे चाहते कमेंट्सद्वारे अभिनेत्रीचे अभिनंदन करताना दिसत आहेत. काही वेळातच या व्हिडीओला हजारो लाइक्स मिळाले आहेत. बिपाशाच्या या लक्झरी कारची किंमत सुमारे ९२ लाख रुपये आहे. मुलीच्या जन्मानंतर केवळ सहा महिन्यांनंतर बिपाशा जिममध्ये घाम गाळताना दिसली होती. तिने व्यायाम करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. व्हिडीओ शेअर करीत बिपाशाने कॅप्शनमध्ये लिहिले होते, 'आई कधीच हार मानत नाही. मी पुन्हा माझे मजबूत व्हर्जन तयार करीत आहे.'