सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यंदा या पुरस्कार सोहळ्याचे ९५ वे वर्ष होते. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतीयांसाठी सर्वच अर्थाने खास ठरला. कारण ९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताला दोन श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री दीपिका पदुकोण ही पुरस्कार जाहीर करताना दिसले. नुकतंच दीपिका पदुकोणने तिला ऑस्कर पुरस्कारादरम्यान काय वाटत होतं? याबद्दल प्रतिक्रिया दिली.

९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने चार चांद लावले होते. यावेळी दीपिकाने काळ्या रंगाचा छान गाऊन परिधान केला होता. त्याबरोबर तिने गळ्यात एक नाजूक नेकलेसही परिधान केला होता. यावेळी दीपिकाला ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला जाण्यापूर्वी काय वाटतं होते? याबद्दल विचारण्यात आले. त्यावर दीपिकाने फारच मजेशीर पद्धतीने उत्तर दिले.
आणखी वाचा : Oscars Awards 2023 : दीपिका पदुकोणच्या मानेवरील टॅटूने वेधलं लक्ष, अर्थ आहे फारच खास

Nagpur MIDC police arrested the youth who molested the girl crime news
विवाहितेच्या अंगावर चिठ्ठी फेकली, पुढे झाले असे की…
Why is neem and jaggery consumed during Gudi Padwa 2024
गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळाचे सेवन का करतात? काय आहे कारण, तज्ज्ञांकडून जाणून घ्या….
Rape Survivor Rajasthan
बलात्कार पीडितेला संतापजनक कारण देत बारावीची परीक्षा देण्यापासून रोखलं; शाळेनं म्हटलं, “वातावरण खराब..”
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

“मी फारच आनंदी आहे. त्याबरोबरच मला थोडं दडपणही आलंय. ऑस्कर पुरस्कार सोहळा नेमका कसा असतो, हे पाहण्यासाठी मी फारच उत्साही आहे. आपण लहानपणापासूनच ऑस्कर पुरस्कार सोहळ्याबद्दल ऐकतोय, बघतोय. तुम्हाला वाटलं आणि तुम्ही ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला गेलात, असं होत नाही. त्यामुळेच ही गोष्ट माझ्यासाठी अभिमानाची आहे. ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्कर मिळणं ही भारतीय सिनेसृष्टीसाठी ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे”, असे दीपिका पदुकोण म्हणाली.

आणखी वाचा : Oscar Awards 2023 : ‘अँड दी ऑस्कर गोज टू…’; भारताची ऐतिहासिक कामगिरी, दोन ऑस्कर पुरस्कार पटकावले

दरम्यान कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर हा भारतीयांसाठी फारच खास ठरला आहे. यंदा भारताला दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे ‘RRR’ने इतिहास रचला आहे.