फातिमा सना शेखनेचं तिच्या गंभीर आजाराबद्दल वक्तव्य चर्चेत; म्हणाली, "मला काम..." | bollywood actress fatima sana shaikh first time speaks openly about her epilepsy condition | Loksatta

फातिमा सना शेखचं तिच्या गंभीर आजाराबद्दल वक्तव्य चर्चेत; म्हणाली, “मला काम…”

फातिमाची चित्रपटाच्या सेटवरही सगळे खूप काळजी घेतात

फातिमा सना शेखचं तिच्या गंभीर आजाराबद्दल वक्तव्य चर्चेत; म्हणाली, “मला काम…”
फातिमा सना शेख

गेल्या काही दिवसात अनेक कलाकार त्यांच्या आजारपणामुळे चर्चेत आले आहेत. अनेक कलाकारांनी आत्तापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मुलाखतींमध्ये त्यांना असलेल्या आजाराबद्दल खुलेपणाने भाष्य केलं आहे. मध्यंतरी समांथा रूथ प्रभू तिच्या आजारामुळे चर्चेत आली होती. त्या पाठोपाठ आता आणखी एका आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्रीने तिला असलेल्या आजाराचे नाव सांगत त्याबद्दल खुलेपणाने भाष्य केलं आहे.

अभिनेत्री म्हणजे फातिमा सना शेख. ‘दंगल’, ‘लुडो’ ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ सारख्या चित्रपटात अभिनय करून लोकप्रियता मिळवलेल्या फातिमाने पहिल्यांदाच तिच्या आजारपणाचा खुलासा केला. मध्यंतरी फातिमाने सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर करत तिला झालेल्या गंभीर आजाराबद्दल माहिती दिली होती. फातिमाला ‘अपस्मार’ (एपिलेप्सी) हा आजार आहे. ‘दंगल’ चित्रपटाच्या ट्रेनिंगदरम्यान या आजाराचं निदान झाल्याचं तिने स्पष्ट केलं होतं. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार नुकतंच फातिमाने एका मुलाखतीमध्ये तिच्या या आजाराविषयी खुलासा केला आहे.

आणखी वाचा : ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ‘प्रचारकी’ असेल, तर मग इस्रायलच्या बहुचर्चित ‘फौदा’ या वेबसीरिजला काय म्हणावं?

फातिमा म्हणाली, “मी माझ्या आजाराचं कधीच लपवलं नाही. हा नेमका प्रकार काय आहे हे जाणून घ्यायलाच मला बरेच दिवस लागले. लोकांना या आजाराबाबतीत माहिती नसल्याने त्यांना मी कमकुवत वाटेन अशी मला भीती वाटायची. ते मला नको होतं. मी लोकांना माझ्या आजाराविषयी सांगितलं तर मला काम मिळणार नाही याची भीती होती.”

इतकंच नाही तर चित्रपटाच्या सेटवरही तिची सगळे काळजी घेतात. ज्या दिग्दर्शकाबरोबर काम करणार आहोत त्याला आपल्या कमकुवत बाजू माहीत असायला हव्यात असंदेखील फातीमाने स्पष्ट केलं. ‘दंगल’साठी चित्रीकरण करत असताना तिला या आजाराचे निदान झाले होते. फातिमा मेघना गुलजार दिग्दर्शित ‘सॅम बहादूर’ या चित्रपटात झळकणार आहे, यामध्ये तिच्याबरोबर विकी कौशलही दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 16:11 IST
Next Story
“मी गरोदर असल्याचं कळताच पालकांनी…” नीना गुप्तांनी सांगितली जुनी आठवण