scorecardresearch

गौहर खानचा मराठमोळा अंदाज; पापाराझींच्या प्रश्नांवर म्हणाली, “मी पुण्याची ‘पठाण’ चित्रपट…”

‘पठाण’ चित्रपटाने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत

gauhar khan 1
फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खान हा सातत्याने चर्चेत आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. बुधवारी २५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी ५७ कोटींची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ७० कोटींचा गल्ला जमवला होता. या चित्रपटाचे सगळेजण कौतुक करत आहेत. या चित्रपटाबद्दल बॉलिवूडमधून प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेत्री गौहर खानने यावर भाष्य केलं आहे.

गौहर खान नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहत आपलं मत मांडत असते. व्यवसायिक,सामाजिक पातळीवर घडणाऱ्या अनेक घटनांवर ती भाष्य करत असते. नुकतीच ती मुंबईतील विमानतळावर दाखल झाली. तेव्हा पापाराझींनी तिला काही प्रश्न विचारले, विशेष म्हणजे पापाराझींनी तिच्या मराठीचे कौतुक केले. ती म्हणाली “मला मराठी येतं, मी मराठी मुलगी आहे मी पुण्याची आहे.” त्यावर लगेचच पापाराझींनी तिला विचारले “पठाण चित्रपट पाहिलात का?” त्यावर गौहर म्हणाली “मी जयपूरला कामासाठी गेले होते. आज रात्री जाणार आहे बघायला, पठाणची चर्चा सर्वत्र आहे.”

अमृता खानविलकरबरोबर परी दिसली हिंदी जाहिरातीत, व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

‘पठाण’ चित्रपटाने दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या KGF Chapter-2 चा रेकॉर्डही मोडला आहे. पहिल्या तीन दिवसांत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून केजीएफ २ हा चित्रपट होता. पण पठाणने या चित्रपटाचा विक्रम मोडला आहे. KGF Chapter 2 या चित्रपटाला मागे टाकत पठाणने बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये आघाडी घेतली आहे.

दरम्यान, ‘पठाण’ या चित्रपटात शाहरुख खानबरोबर दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर त्यांच्याबरोबरच या चित्रपटात सलमान खानची झलक पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 11:43 IST