bollywood actress Jacqueline Fernandez participated in swachh bharat mission at versova beach including bjp mla spg 93 | स्वच्छ भारत अभियानात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सहभागी, वर्सोवा समुद्रकिनारी केली साफसफाई | Loksatta

स्वच्छ भारत अभियानात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सहभागी, वर्सोवा समुद्रकिनारी केली साफसफाई

या स्वच्छता मोहिमेत मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक, भाजपाचे कार्यकर्ते सामील झाले होते.

स्वच्छ भारत अभियानात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सहभागी, वर्सोवा समुद्रकिनारी केली साफसफाई
Jacqueline Fernandez participated in versova beach cleaning

जॅकलिन फर्नांडिस मूळची श्रीलंकेची असलेली ही मॉडेल आज बॉलिवूडमध्ये आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सुकेश प्रकरणात ती अडकल्याने सध्या सगळीकडे तिच्या नावाची चर्चा आहे. जॅकलिन आता एका नव्या घटनेमुळे चर्चेत आली आहे. जॅकलिन नुकतीच स्वच्छता अभियानात दिसून आली आहे नुकतेच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या अभियानाची पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने वर्सोवा समुद्रकिनारी केलेल्या स्वच्छतेबद्दल माहिती दिली.

जॅकलिनने पोस्टमध्ये लिहले आहे ‘वर्सोवा समुद्रकिनारी सुरु सुरु असलेल्या स्वछता मोहिमेत सहभागी झाले. दीपक मुकुट यांच्या स्वच्छ भारत अभियान या चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा, तुमच्या चित्रपटामुळे मला प्रेरणा मिळाली. तसेच या मोहिमेत जे लोक सहभागी झाले त्या सगळ्यांना धन्यवाद. आमदार भारती लव्हेकर यांच्या पुढाकाराने हे शक्य झाले त्यामुळे त्यांनादेखील धन्यवाद’. या स्वच्छता मोहिमेत मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक, भाजपाचे कार्यकर्ते सामील झाले होते.

“आम्ही चित्रपटासाठी कोणतेही… ” ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे व्हीएफएक्स करणाऱ्या कंपनीने केला खुलासा

मुंबईतील समुद्रकिनारी अनेकदा कचऱ्याचे साम्रज्य असते. अनेक सामाजिक संस्था पुढाकार घेऊन समुद्रकिनारे स्वच्छ करताना दिसून आले आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी या मोहिमेत सहभागी होताना दिसून येत असतात. स्वच्छता अभियानाची सुरवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये केली होती. रस्त्यांच्या व भारतातील विविध नद्यांच्या स्वच्छतेसाठी भारत सरकारने सुरू केलेलं राष्ट्रीय पातळीवरील अभियान आहे.

अभिनेत्री जॅकलिनने ‘अल्लादिन’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर रितेश देशमुख अमिताभ बच्चन हे कलाकार होते. ‘हाऊसफुल्ल २,३’, ‘जुडवा’, ‘किक’, ‘रेस ३’ सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलं आहे. ती अक्षय कुमारच्या आगामी राम सेतू चित्रपटात ती दिसणार आहे भूत पोलीस, बच्चन पांडे या चित्रपटात ती शेवटची दिसली होती. सुकेश प्रकरणात ईडीकडून तिला चौकशीसाठी बोलवण्यात आले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
श्रीदेवी यांनी ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटात नेसलेल्या साडीचा होणार लिलाव; या कारणासाठी दिग्दर्शिकेने घेतला निर्णय

संबंधित बातम्या

‘हेरा फेरी ३’मध्ये अक्षय कुमार राजूच्या भूमिकेत परतणार? चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर
१७ व्या वर्षी लग्न, अंडरवर्ल्ड डॉनशी संबंध; तब्बल ३० वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये परतणार प्रसिद्ध अभिनेत्री
“काँग्रेस, आप आणि बेरोजगार…” आलिशान घरावरून ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची तिरकस पोस्ट
‘कयामत से कयामत तक’साठी आमिर खानला मिळालं होतं एवढं मानधन
‘दृश्यम २’च्या भरघोस यशानंतर दिग्दर्शक चित्रपटाच्या तिसऱ्या भागाच्या तयारीत, म्हणाला “कथा तयार आहे पण…”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘मिर्झापूर’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच येणार सीजन ३; अभिनेत्याने दिले संकेत
“सलमानच्या गाडीला…” अतरंगी ड्रेसमुळे धडपडणाऱ्या उर्फीला पाहून नेटकऱ्याची कमेंट
IND vs BAN: आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास! बांगलादेशने जिरवली आणि रोहित सेनेच्या खिशाला कात्री
‘मन उडू उडू झालं’ फेम अभिनेता सोशल मीडियावर मागतोय नोकरी; बायोडेटा शेअर करत म्हणाला…
तीन महिन्यांपूर्वी मावशीचं झालं निधन, अमृता खानविलकर भावूक होत म्हणाली, “कारण तिला मी…”