जान्हवी कपूर आई श्रीदेवी यांच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनयक्षेत्रामध्ये पदार्पण केलं. बॉलिवूड चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत जान्हवीने अल्पवधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. स्टार किड्सच्या यादीमध्येही जान्हवीचं नाव टॉपला आहे. जान्हवीने नुकतेच इंडस्ट्रीबद्दल भाष्य केलं आहे.

जान्हवी कपूर नुकतीच इंडिया टुडेच्या एका कार्यक्रमात उपस्थित होती. या कार्यक्रमात तिने इंडस्ट्रीपासून आगामी चित्रपटांच्याबाबतीत माहिती दिली आहे. इंडस्ट्रीबद्दल बोलताना ती असं म्हणाली, “गेल्या पाच वर्षांत उद्योगक्षेत्रात बरेच बदल झाले आहेत. जेव्हा मी सुरुवात करत होते तेव्हा तेव्हा माझ्या पहिल्या चित्रपटाच्या वेळी सोशल मीडियाची सुरवात झाली होती. आमच्या इंडस्ट्रीमध्ये मी येण्याआधी एखाद्या गोष्टीचे महत्व किंवा त्याबद्दलची धारणा कमी होती. मात्र अचानक सोशल मीडिया आणि पीआर या संकल्पनांचे महत्व वाढू लागले.”

The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Sharad Ponkshe son sneh ponkshe movie
शरद पोंक्षेंचा मुलगा सिनेसृष्टीत करतोय पदार्पण, पहिल्याच चित्रपटात वडिलांसह काम करण्याबाबत स्नेह पोंक्षे म्हणाला…
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

ऑस्कर विजेत्या एसएस राजामौलींबरोबर बॉलिवूडच्या ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्रीला करायचं आहे काम; म्हणाल्या…

ती पुढे म्हणाली, ” जवळच्या लोकांकडून आणि माझ्या पालकांकडून एक गोष्ट ऐकत आले आहे ती गोष्ट म्हणजे मान खाली घालून तुम्ही काम करा, मेहनत करा तेवढं खूप आहे. मी आता आजूबाजूला बघते तेवहा दिसतं की तुमचा स्वतःचा ब्रँड करण्याला खूप महत्त्व दिले जात आहे. अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.”

जान्हवी तिच्या कामापेक्षाही तिच्या लाईफस्टाईल आणि तिच्या फॅशनमुळे अधिक चर्चेत असते. ही लाईफस्टाईल तिने तिच्या स्वतःच्या मेहनतीवर मिळवली आहे. मीडिया रिपोर्टनुसार ती ५८ कोटींची मालकीण आहे. तर दर महिन्याला ती ५० लाख रुपये कमावते.