बॉलिवूड अभिनेत्री काजोल दरवर्षी नवरात्रीत दुर्गापूजेत सहभागी होते. यंदाही तिने तिच्या कुटुंबासह दुर्गापूजेला हजेरी लावली. यावेळीचे तिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या कार्यक्रमादरम्यान काजोलच्या एका व्हिडीओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

सध्या सर्वत्र नवरात्री उत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. मोठ्या थाटामाटात नवरात्रौत्सव साजरा केला जात आहे. सर्वसामान्यांपासून ते अगदी मोठमोठ्या कलाकारांपर्यंत सर्वजण देवीच्या भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचे दिसत आहेत. विविध बॉलिवूड कलाकरही विविध मंडळात जाऊन देवीचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत.
आणखी वाचा : “…तर त्यांनी मला नक्कीच बसवलं असतं”, अशोक सराफ यांना सुनावणाऱ्यांवर भडकले भाऊ कदम, म्हणाले “कृपया…”

hollywood celebrity Jennifer Aniston Salmon sperm facial
हॉलीवूड अभिनेत्रीचं ‘हे’ फेशियल होतंय व्हायरल! अ‍ॅंटी एजिंगसाठी खरंच ठरतंय का फायदेशीर? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
a boy can not swim but jumped into the well as a friend said
पोहता येत नव्हते पण मित्र म्हणाला म्हणून विहिरीत उडी मारली; चिमुकल्याचा मैत्रीवरचा विश्वास, VIDEO होतोय व्हायरल
balya dance traditional folk dance from kokan
Video : कोकणकरांच्या जिव्हाळ्याचा विषय… बाल्या डान्स एकदा पाहाच, Video होतोय व्हायरल
Mahima Chaudhry met Hina Khan during her cancer treatment
कर्करोगावर मात करणाऱ्या महिमा चौधरीने हिना खानची घेतली भेट, अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली….
a teacher danced with student so gracefully
VIDEO : शिक्षकाने केला विद्यार्थ्याबरोबर जबरदस्त डान्स, स्टेप्स अन् हावभाव पाहून व्हाल थक्क! व्हिडीओ होतोय व्हायरल
when your salary credit a young man sings funny song
“जेव्हा तुमचा पगार येतो..” तरुणाने गायलं भन्नाट गाणं; Video होतोय व्हायरल
Shubman Gill and Avneet Kaur dating
शुबमन गिल ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट? इन्स्टा स्टोरी व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण, कोण आहे जाणून घ्या?

नुकतंच एका दुर्गापुजेवेळी काजोल तिचा मुलगा युगसह सहभागी झाली होती. यावेळी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत काजोल ही मोबाईलमध्ये बघत बघत चालताना दिसत आहे. मात्र चालता चालता समोर दुर्लक्ष झाल्याने काजोलचा तोल जातो आणि ती खाली पडते.

पण सुदैवाने तिथे इतर लोक असल्याने ते तिला सावरतात. यावेळी तिचा मोबाईल खाली पडतो. पण आजूबाजूला इतर लोक असल्याने तिला दुखापत होत नाही. यानंतर तिचा मुलगा युग तिची विचारपूस करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : “हृदयाला छिद्र, रक्तवाहिन्या बंद आणि फक्त सहा महिने…” प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग, म्हणाली “तिला भूल देणंही…”

काजोलच्या या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत. “ही नेहमीच पडत असते”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने “स्टाईल मारत राहिलात तर असंच होतं”, असे म्हटले आहे. तर एकाने “मोबाईल पाहणं इतकं गरजेचे आहे का”, असा प्रश्न विचारला आहे.