बॉलिवूडची ‘धकड’ गर्ल कंगना रणौत आज तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनयाव्यतरिक्त आपल्या परखड वक्तव्यामुळे कंगना नेहमीच चर्चेत असते. आज वाढदिवसानिमित्त कंगनाने तिच्या फॉलोअर्स, फॅन्स आणि अगदी द्वेष करणाऱ्यांसाठी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वाढदिवसानिमित्त कंगनाचा व्हिडओ शेअर
कंगनाने उदयपूरमध्ये तिचा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तिने त्या सगळ्या लोकांची माफी मागितली आहे ज्यांची तिच्या बोलण्याने मनं दुखावली गेली आहेत. व्हिडिओमध्ये, कंगना तिच्या आई आणि वडिलांच्या पाठिंब्याबद्दल आणि तिच्या गुरूंचे (सद्गुरु आणि स्वामी विवेकानंद) त्यांच्या शिकवणीबद्दल आभार मानून व्हिडिओची सुरुवात करताना दिसत आहे. कंगना म्हणते, “माझ्या शत्रूंनी, ज्यांनी मला आजपर्यंत कधीही आराम करू दिला नाही. कितीही यश मिळालं तरी मला यशाच्या वाटेवर कायम ठेवलं. मला लढायला शिकवले, संघर्ष करायला शिकवले, मी त्यांची सदैव ऋणी राहीन.
व्हिडिओमध्ये कंगना खूपच सुंदर दिसत आहे. कंगनाने हिरव्या आणि गुलाबी रंगाची सिल्क साडी घातली आहे. तसेच गळ्यात सोनेरी हार. कानातले आणि कपाळावर लाल टिकलीमध्ये कंगना भारतीय लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे.